कडुलिंबाला लागलाय आंबा, मंत्र्याच्या बंगल्यात वेगळाच नजारा, पाहून सर्वच हैराण

मध्यप्रदेशचे पंचायत तथा ग्रामविकास मंत्री प्रल्हाद पटेल यांचा बंगला सध्या चांगल्याच चर्चेत आहे. कारण त्यांच्या बंगल्याच्या परिसरात एक कडुलिंबाचं झाड आहे. या झाडाला चक्क आंबे लटकले आहेत. या झाडाकडे शनिवारी (25 मे) मंत्र्यांची नजर पडली तेव्हा ते सुद्धा आश्चर्यचकीत झाले. प्रल्हाद पटेल यांना याच वर्षी या बंगल्याच वाटप करण्यात आलंय.

कडुलिंबाला लागलाय आंबा, मंत्र्याच्या बंगल्यात वेगळाच नजारा, पाहून सर्वच हैराण
कुडुलिंबाच्या झाडाला आंब्याचं फळ, तु्म्ही म्हणाल हे कसं शक्य? पण हेच खरंय
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 5:14 PM

कडुलिंबाच्या झाडाला आंब्याचं फळ आलं, असं आपल्याला कुणी सांगितलं तर आपला विश्वास होईल का? अर्थात नाहीच होणार. पण काही गोष्टी आपल्या कल्पनेच्याही पलिकडे असतात. सध्या मध्यप्रदेशच्या एका मंत्र्यांच्या बंगल्यातील कडुलिंबाचं झाड यामुळेच जास्त चर्चेत आलं आहे. कारण या कुडुलिंबाच्या झाडाला चक्क आंब्याची फळं आली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. कडुलिंबाचं हे झाड मध्यप्रदेशचे ग्रामविकास मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या बंगल्यातील आहे. त्यामुळे प्रल्हाद पटेल यांचा बंगलादेखील चांगलाच चर्चेत आला आहे. प्रल्हाद पटेल यांचं काल शनिवारी (26 मे) या झाडाकडे लक्ष गेलं. त्यांनी कडुलिंबाच्या झाडाला आंब्याचं फळ बघितलं आणि ते आश्चर्यचकीत झाले. त्यांनी स्वत:च्या सोशल मीडिया अकाउंट्सवर या झाडाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यानंतर प्रल्हाद पटेल यांच्या बंगल्याविषयी चांगलीच चर्चा होत आहे.

मंत्री प्रल्हाद पटेल यांचं निवासस्थान हे भोपाळच्या प्रोफेसर कॉलनीजवळ सिव्हिल लाईनला B-7 बंगला येथे आहे. त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झाडे आणि रोपटे लावण्यात आलेले आहेत. बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय हिरवागार आहे. याच ठिकाणी एक कडुलिंबाचं झाड आहे. या झाडाला आंब्याचं फळ आलं आहे. या बंगल्यात सध्या बांधकाम काम सुरु आहे. त्यामुळे प्रल्हाद पटेल शनिवारी बंगल्याची पाहणी करायला आले होते. यावेळी बंगल्याचं निरीक्षण करायला आले असता त्यांची नजर या कडुलिंबाकडे पडली. यावेळी कडुलिंबाच्या झाडाला आंब्याच फळ बघून ते आश्चर्यचकीत झाले.

कडुलिंबाचं झाड 30 वर्षांपेक्षा जुनं

प्रल्हाद पटेल यांनी एक्सवर झाडाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत माहिती दिली. “भोपाळच्या निवासस्थानी हे कडुलिंबाचं झाड दिसलं. या झाडाच्या जवळ जावून पाहिलं तर या झाडाला आंब्याचं फळ आलेलं बघायला मिळालं. काही कुशल बागायतदारांनी हा प्रयोग वर्षापूर्वी केला असेल, जे आश्चर्यापेक्षा कमी नाही. हे झाड सुमारे 30 वर्ष जुने असल्याचा अंदाज आहे. मी कर्मचाऱ्यांना या झाडाची विशेष काळजी घेण्यास सांगितलं आहे”, असं प्रल्हाद पटेल आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

B7 बंगल्याचा इतिहास काय?

प्रल्हाद पटेल यांना याचवर्षी हा बंगला देण्यात आला. याआधी शिवराजसिंह सरकारमध्ये उद्योग मंत्री ओमप्रकाश सकलेचा या बंगल्यात वास्तव्यास होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानानंतर हा बंगला सर्वात मोठा शासकीय आहे. या बंगल्यात कधी एकेकाळी मुख्यमंत्र्यांचं ऑफिसही असायचं. पीसी सेठी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ते याच बंगल्यात राहायचे. याशिवाय माजी उपमुख्यमंत्री शिवभानू सिंह सोळंकी आणि सुभाष यादव देखील या माजी मंत्र्यांनादेखील हाच बंगला मिळाला होता. 2018 मध्ये काँग्रेस सरकार स्थापन झालं तेव्हा हा बंगला माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देण्यात आला होता. पण त्यांनी या बंगल्यात शिफ्ट होण्याऐवजी आपल्या जुन्याच निवासस्थानी राहण्याचा निर्णय घेतला होता.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.