भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी, सतत जळत असतात चिता
जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी ही भारतात आहे. या ठिकाणी सतत चिता या जळत राहतात. दररोज जवळपास ३०० हून अधिक मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. कुठे आहे ही स्मशानभूमी आणि काय आहे त्या मागची गोष्ट जाणून घ्या.
हिंदू धर्मात कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर अंतिम संस्कार करुन त्याला जाळले जाते. इतर धर्मात तसे होत नाही. ईसाई आणि मुस्लीम धर्मात मृतदेह पुरण्याची प्रथा आहे. जिथे मृतदेह दहन केले जाते त्याला स्मशानभूमी म्हणतात. भारतात जवळपास सर्वच शहरांमध्ये आणि गावांमध्ये स्मशानभूमी असतेच. कुठे मोठी तर कुठे लहान असेल पण ती असतेच. पण तुम्हाला माहित आहे का की भारतातील सर्वात मोठी स्मशानभूमी कुठे आहे. अनेकांना कदाचित हे माहित नसेल की ती बनारसमध्ये आहे. ज्याला मणिकर्णिका घाट असे म्हणतात.
मनिकर्णिका घाट ही भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. असं सांगता की, येथे एका दिवसात जवळपास 300 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. ही भारतातील एकमेव अशी स्मशानभूमी आहे. जिथे सतत चिता जळत असतात.
भारतातील सर्वात मोठी स्मशानभूमी
बनारस हे काशी आणि वाराणसी नावाने ही ओळखले जाते. हे भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. वाराणसीची स्थापना सुमारे 5000 वर्षांपूर्वी झाल्याचे म्हटले जाते. काही तज्ज्ञांचे मत आहे का की हे शहर 3000 वर्षे जुने आहे. बनारसमध्ये एकूण ८४ घाट आहेत. त्यातील सर्वात मोठा घाट मणिकर्णिका आहे.
भारतातील सर्वात मोठे स्मशानभूमी असल्याने येथे आजुबाजुच्या अनेक गावांमधून आणि शहरातून मृतदेह येतात. 300 हून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय येथे आहे. मणिकर्णिका घाटाबाबत अशी मान्यता आहे की, येथे माणसावर अंत्य संस्कार केले तर त्याच्या आत्म्याला मोक्ष प्राप्त होतो. आणि याच कारणामुळे भारतातील दुर्गम भागातूनही लोकं येथे शेवटी अंत्य संस्कारासाठी येतात.
चिता सतत जळत राहतात
मणिकर्णिका घाटावर नेहमीच चिता जळत राहतात. जगात काहीही झाले तरी येथे 24 तास चिता जळत असतात. याबाबत अनेक कथा प्रचलित आहेत. एका पौराणिक कथेनुसार मणिकर्णिका घाटाला माता पार्वतीने शाप दिला होता की येथील आग कधीच विझणार नाही.
कथा अशी आहे की, एकदा माता पार्वती या ठिकाणी स्नान करत होत्या. या दरम्यान त्यांचे कर्णफुले येथील तलावात पडले. त्यामध्ये एक रत्नही होतं. ते शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले. मात्र ते सापडले नाही. त्यामुळे माता पार्वती यांना खूप राग आला. म्हणूनच त्यांनी या जागेला शाप दिला की जर माझे रत्न मिळाले नाही तर ही जागा नेहमी जळत राहिल. यामुळेच येथे चिता सतत जळत असतात, यामुळेच या ठिकाणाचे नाव मणिकर्णिका पडले असे ही म्हटले जाते.