मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, दोन गटात गोळीबार, 13 जणांचा मृत्यू

मणिपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये आज पुन्हा हिंसाचार घडला आहे. दोन गटात तुफान राडा झालाय. यावेळी अंदाधुंद गोळीबार देखील झालाय. या गोळीबारात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटनेमुळे मणिपूरच्या सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, दोन गटात गोळीबार, 13 जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Dec 04, 2023 | 6:49 PM

तेंगनोउपल (मणिपूर) | 4 डिसेंबर 2023 : मणिपूरमध्ये हळहळू शांतता प्रस्थापित होऊन परिस्थिती पूर्ववत होत असल्याचं वाटत असतानाच आज पुन्हा हिंसाचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरच्या तेंगनोउपल जिल्ह्यात दोन गटात मोठा हिंसाचार झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दोन उपद्रवांच्या गटामध्ये आज दुपारच्या सुमारास अंधाधुंद गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहेत. घटनेची माहिती मिळताच आसाम रायफल्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या टीमने उपद्रवींना पकडण्याचं काम सुरु केलं आहे. संबंधित परिसरात पुन्हा तणाव निर्माण होणार नाही यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मणिपूरमधील हिंसा अजूनही पूर्णपणे शमलेली नाही. अजूनही काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. मणिपूरमधील हिंसाचाराच्या घटनांना आळा बसावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अनेक बैठका घेतल्या. पण अजूनही हिंसाचार कमी झालेला नाही. विशेष म्हणजे तेंगनोउपल येथीन कुकी-जो या समाजाकडून भारत सरकार आणि यूएनएलेफ यांच्यात झालेल्या शांतता कराराचं स्वागत करण्यात आलं होतं. पण त्यानंतर लगेच आज दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यात हिंसाचाराची मोठी घटना समोर आली आहे.

बाहेरुन आलेल्यांचे मृतदेह आढळले

उपद्रवींनी जिथे हिंसाचार केला तो परिसर सुरक्षा दलांच्या केंद्रापासून 10 किलोमीटर अंतरावर होते. घटनेची माहिती मिळताच जवान परिसरात पोहोचले तेव्हा त्यांना लीथू गावाजवळ 13 मृतदेह आढळले. हे मृतदेह परिसरातील नागरिकांचे नसल्याची माहिती मिळत मिळत आहे. हे सर्व बाहेरुन आले होते. आतापर्यंत एकाही मृतदेहाची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी कोणतेही हत्यार मिळालेलं नाही. पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे.

विशेष म्हणजे तेंगनोउपल जिल्ह्यात तब्बल सात महिन्यांनंतर पहिल्यांदाच काल रविवारी इंटरनेट सेवेवरील बंदी दूर करण्यात आली होती. सीमावर्ती भागातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही इंटरनेट सेवा बंद आहे. पण काल इंटरनेट सेवेवरील बंदी उठवल्यानंतर आज हिंसाचाराची घटना घडली.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.