Manipur Viral Video | लूटमार, जाळपोळ, बलात्कार, भावाची हत्या 4 मे रोजी मणिपूरच्या गावात अखेर काय झालेलं?

Manipur Viral Video | सध्या संपूर्ण देशात या घटनेने खळबळ उडवून दिलेली आहे. लोक आपला जीव वाचवून पळत होते. यातल्या पाच लोकांना पोलिसांनी वाचवलं व सुरक्षित स्थळी घेऊन जात होते.

Manipur Viral Video | लूटमार, जाळपोळ, बलात्कार, भावाची हत्या 4 मे रोजी मणिपूरच्या गावात अखेर काय झालेलं?
Manipur Viral Video
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 11:44 AM

नवी दिल्ली : मणिपूरच्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलय. जमावाने महिलेला विवस्त्र करुन सर्वत्र फिरवलं. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडिओमधून मणिपूरची भयानक परिस्थिती दिसून येतेय. 4 मे रोजी ही घटना घडली. त्यानंतर 77 दिवसांनी 4 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. या घटनेवरुन देशात संतापाची लाट उसळल्यानंतर हे सर्व झालं. रस्त्यावरुन संसदेपर्यंत, विरोधी पक्ष ते सत्ता पक्षाने आपला संताप व्यक्त केला.

4 मे रोजी मणिपूरच्या त्या गावात नेमक काय घडलं होतं? महिलेला विवस्त्र करुन रस्त्यावर फिरवण्यात आलं, त्यावेळी काय परिस्थिती होती?

4 मे रोजी काय घडलं?

कुकी-नगा आणि मैतई समुदायात मणिपूरमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरु आहे. आरक्षणावरुन वाद सुरु झाला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर वाद आणखी भडकला. मैतई समुदायाला एसटीचा अधिकार देण्यावरुन 4 मे रोजी एक आंदोलन करण्यात येणार होतं. याच प्रदर्शनापासून संपूर्ण राज्यात हिंसाचाराचा आगडोंब उसळलाय. दोन्ही समुदाय आमने-सामने आहेत.

किती हजार लोक गावात घुसले?

मणिपूरच्या कंगपोकपी जिल्ह्यात के बी. फैनम गावात मैतई समुदायाच्या लोकांनी हल्ला केला. जवळपास 1000 लोक या गावामध्ये घुसले. त्यांनी तोडफोड, लुटमार आणि जाळपोळ सुरु केली. लोक आपला जीव वाचवून पळत होते. यातल्या पाच लोकांना पोलिसांनी वाचवलं व सुरक्षित स्थळी घेऊन जात होते. यात 3 महिला आणि दोन पुरुष होते. उग्र जमावाने पोलिसांच सुरक्षा कड मोडून त्यांना आपल्या ताब्यात घेतलं व हल्ला केला.

बहिणीला वाचवणाऱ्या भावाची हत्या

या पाच जणांपैकी 56 वर्षाच्या पुरुषाची हत्या करण्यात आली. 3 महिलांना विवस्त्र करण्यात आलं. यात 2 महिलांना रस्त्यावर फिरवण्यात आलं. 21 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीच्या भावाने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उग्र जमावाने त्याची हत्या केली. ज्या दोन मुलींना विवस्त्र करुन फिरवण्यात आलं, त्यांच लैंगिक शोषण करण्यात आलं.

विवस्त्र केलेल्या महिलेच्या पतीने काय सांगितलं?

उग्र जमावाने ज्या महिलांना विवस्त्र केलं, त्यातल्या एका महिलेचा पती कारगिल युद्ध लढला आहे. ही महिला त्या व्हायरल व्हिडिओमध्ये नाहीय. “त्या दिवशी जमाव खूप उग्र झाला होता. जमावाने अनेक घरं उद्धवस्त केली. लोकांनी जनावर सुद्धा पळवली” असं महिलेच्या पतीने सांगितलं. ऑफिसरच दुसऱ्याच दिवशी ट्रान्सफर

उग्र जमावाने गन पॉइंटवर महिलांना विवस्त्र केलं. “या घटनेचा झीरो एफआयआर नोंदवण्यात आला होता. पण हा एफआयआर नोंदवणाऱ्या ऑफिसरच दुसऱ्याच दिवशी ट्रान्सफर झालं. त्यामुळे कारवाईला विलंब झाला. जमावाने माझही घर पेटवून दिलं. अनेक वर्षांची मेहनत आणि बचत करुन हे घर बनवलं होतं” असं महिलेच्या पतीने सांगितलं. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार
प्रचार तापला, 'व्होट जिहाद'ला 'धर्मयुद्धा'नं उत्तर, फडणवीसांचा पलटवार.
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.