मनमोहन सिंहांचा मोदी सरकारवर हल्ला, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तीन मार्ग दाखवले

भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मनोमहन सिंह यांनी मोदी सरकारला तीन सल्ले दिले आहेत (Manmohan Singh give suggestion to modi government for to grow up economy).

मनमोहन सिंहांचा मोदी सरकारवर हल्ला, अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तीन मार्ग दाखवले
Follow us
| Updated on: Aug 10, 2020 | 3:50 PM

नवी दिल्ली : कोरोना संकटाचा मोठा फटका देशाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यस्थेला बसलेली झळ भरुन काढावी किंवा देशाची अर्थव्यवस्था सुधारावी यासाठी माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंह यांनी केंद्र सरकारला तीन महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकाच्या अर्थव्यवस्थेशी संबंधित धोरणांवरही टीका केली (Manmohan Singh give suggestion to modi government for to grow up economy).

“केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा करणं हे सर्वसामान्य नागरिकांना एखादा झटका देण्यासारखच आहे. या लॉकडाऊनमुळे लोकांचं प्रचंड नुकसान झालं. लॉकडाऊनची अचानक घोषणा करुन नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याची सक्ती करणं हे केंद्र सरकारचं असंवेदनशील पाऊल होतं”, असं मनमोहन सिंह म्हणाले.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान, भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी मनोमहन सिंह यांनी मोदी सरकारला तीन सल्ले दिले आहेत (Manmohan Singh give suggestion to modi government for to grow up economy).

1) केंद्र सरकारने डायरेक्ट टॅक्स ट्रान्सफर करुन सर्वसामान्य जनतेची मदत करायला हवी.

2) केंद्र सरकारने बिजनेस लोनवर जोर दिला पाहिजे, जेणेकरुन लोकांना व्यवसाय करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल.

3) आर्थिक क्षेत्राला स्थैर्य द्यावे लागेल. संस्थात्मक स्वायत्तता देऊन ही आर्थिक स्थैर्यता प्राप्त करता येईल.

मनमोहन सिंह यांनी सरकारच्या व्यापार संबंधित धोरणांवरही टीका केली. देशाची अर्थव्यवस्था वाईट परिस्थितीत असताना दुसऱ्या देशांकडे बघून सरकारने आयात शुल्क वाढवलं आहे. हे चुकीचं आहे, असं मनमोहन सिंह म्हणाले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.