माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूची काँग्रेसला सोडचिठ्ठी; आपमध्ये प्रवेश

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. (Manmohan Singh's half brother joined aap)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बंधूची काँग्रेसला सोडचिठ्ठी; आपमध्ये प्रवेश
मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 7:40 AM

अमृतसर: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. त्यांच्या सोबत अमृतसरचे माजी महापौर ओम प्रकाश गब्बर यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे. (Manmohan Singh’s half brother joined aap)

ओम प्रकाश गब्बर पहिल्यांदा अकाली दलाच्या तिकिटावर नगरसेवक झाले होते. 2017मध्ये ते काँग्रेसमध्ये गेले होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूकही लढली होती. गब्बर हे भगवान वाल्मिकी धूना साहिब मॅनेजमेंट ट्रस्टचे अध्यक्षही आहेत. तर मनमोहन सिंग यांचे बंधू एसएस कोहली हे लष्करातील माजी कमांडर आहे. आम आदमी पार्टीच्या धोरणांवर प्रभावित होऊन त्यांनी आपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

या नेत्यांचा प्रवेश

एसएस कोहली यांच्यासह काँग्रेसच्या मजदूर विभागाचे जिल्हा अध्यक्ष साहिब सिंग, माजी बँक पदाधिकारी जे. एस. बिंद्रा यांनीही आपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच तरसेम सिंग रानीके. मंजीत सिंह वडाली. बूटा सिंग संगतपुरा, निशान सिंग ग्रिडिंग, मजार सिंग, मणी ब्लू सिटीचे राजकुमार आणि कन्हैया तसेच धर्मपाल आदी नेत्यांनी आपचे नेते आमदार कुलवंत सिंग पंडोरी, जयकिशन सिंग रोडी आणि मंजीत सिंग बिलासपूर यांच्या उपस्थित आपमध्ये प्रवेश केला.

आपच का?

आम आदमी पार्टीची लोकप्रियता पुन्हा एकदा वाढत आहे. नुकत्याच झालेल्या गुजरातच्या सूरत महापालिका निवडणुकीत आपने 15 जागा जिंकल्या आहेत. या ठिकाणी आप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. पंजाबमध्येही आपची लोकप्रियता वाढत आहे. तर दुसकरीकडे काँग्रेसमधील आपसातील बंडाळी चव्हाट्यावर आल्याने पक्षात दोन गट पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आगामी काळात आपला मोठा फायदा होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसचे अनेक नेते आपमध्ये सामील होत आहेत. (Manmohan Singh’s half brother joined aap)

संबंधित बातम्या:

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसीत ABVPचा सुपडा साफ, काँग्रेस आणि सपाच्या विद्यार्थी संघटनेचा मोठा विजय

नीरव मोदी 28 दिवसांनंतर येऊ शकतो भारतात; पण बचावाचे अजूनही तीन मार्ग

तामिळनाडूत सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्याचं वय ६० वर्षे, महाराष्ट्रात काय स्थिती?

(Manmohan Singh’s half brother joined aap)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.