Mann Ki Baat: कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे; मोदींची ‘मन की बात’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. (Mann Ki Baat: Centre standing beside states to help them get through second Covid wave)

Mann Ki Baat: कोरोना आपल्या संयमाची परीक्षा घेत आहे; मोदींची 'मन की बात'
narendra modi
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 11:48 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी मन की बातमधून संवाद साधला. देशभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटावर त्यांनी भाष्य केलं. कोरोना संयमाची परीक्षा घेत आहे. आपले अनेक सहकारी, नातेवाईक आपल्याला सोडून गेले आहेत. हा धैर्य आणि संयमाचा क्षण आहे, असं पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. (Mann Ki Baat: Centre standing beside states to help them get through second Covid wave)

नरेंद्र मोदी यांनी मन की बातमधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या विरोधातील लढाई मजबुतीने सुरू आहे. सर्व सेक्टरच्या लोकांनी सल्ले दिले आहेत. राज्य सरकारही आपल्या पातळीवर काम करत आहे, असं ते म्हणाले. कोरोना काळात केवळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फॅमिली डॉक्टर्स किंवा तुमच्या जवळपासच्या डॉक्टर्सचा सल्ला घ्या. कोरोनाविरुद्धची लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ आणि संशोधकांच्या सल्ल्यांची गरज आहे. राज्य सरकारांकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

केंद्र सरकारकडून सर्व राज्यसरकारांना विनामूल्य लस पुरवण्यात आली आहे, जिचा लाभ 45 वर्षांवरील सर्व लोक घेऊ शकतात. आता 1 मे पासून देशात 18 वर्षांवरील प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे, असं ते म्हणाले. केंद्र सरकार सर्व राज्यांना मोफत कोरोना लसी पाठवत आहे. कोणत्याही नागरिकानं कोरोना लसीबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

मनोधैर्य उंचावलं होतं

कोरोनाच्या पहिल्या लाटेवर यशस्वीपणानं मात केल्यानंतर देशातील जनतेचे मनोधैर्य उंचावलेले होते. मात्र, दुसऱ्या लाटेने देशाला धक्का दिला. आपल्याला दुसऱ्या लाटेवर विजय मिळवायचा आहे. कोरोना संदर्भात तज्ञ, औषध उद्योग आणि ऑक्सिजन निर्मिती यावर बैठका घेत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कॉर्पोरेट क्षेत्राला आवाहन

देशातील कॉर्पोरेट क्षेत्रानं कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत सहभागी व्हावं आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना लसीकरण करुन घ्यावं, असं आवाहन करतानाच केंद्र सरकार भविष्यामध्येही कोरोना लसीकरणाचा मोफत कार्यक्रम सुरु ठेवेल. राज्यांनी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम जनतेपर्यंत पोहोचवावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान

यावेळी त्यांनी रुग्णवाहिका चालकांचंही कौतुक केलं. कोरोना विषाणू संसर्गाच्या विरोधातील लढ्यामध्ये रुग्णवाहिका चालकांचं मोठं योगदान आहे. माझ्या मनात त्यांच्याविषयी धन्यवादाची भावना आहे, असं ते म्हणाले.

थेट तज्ज्ञांशी संवाद

नागरिकांमध्ये कोणत्या प्रकारे कोरोनाची भीती निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी थेट तज्ज्ञांना मन की बातमध्ये पाचारण केलं. तसेच त्यांना देशावासियांशी संवाद साधायला लावला. मुंबईतील लिलावती रुग्णालयाती प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी, श्रीनगरचे डॉ. नाविद यांना जनतेशी संवाद साधायला संधी दिली. तसेच रुग्णवाहिका चालवणारे, कोरोना आजारातून बऱ्या झालेल्या गृहिणींचाही देशवासियांशी संवाद साधून दिला. (Mann Ki Baat: Centre standing beside states to help them get through second Covid wave)

संबंधित बातम्या:

LIVE | साताऱ्यात अर्टिगा कारचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

Corona Cases and Lockdown News LIVE : देशातील कोरोना संकट पुन्हा गडद, दुसरी लाट मोठी, पण घाबरु नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी

शरद पवारांच्या आवाहनाला यश, ऑक्सिजन निर्मितीचा पहिला पायलट प्रोजेक्ट ‘हा’ कारखाना सुरु करणार

(Mann Ki Baat: Centre standing beside states to help them get through second Covid wave)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.