15 दिवसांच्या मेगा ब्लॉकमुळे अनेक एक्स्प्रेस रद्द, प्रवास करण्यापूर्वी चेक करुन घ्या तुमची गाडी
indian railway mega block: मेगा ब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या ६ गाड्यांना बसला आहे. त्यांचे मार्ग बदलले आहेत. यात मुंबई - फिरोजपूर एक्स्प्रेस ५ ते १६ सप्टेंबरपर्यंत मथुरा, अलवर, रेवारी, अस्थल बोहार मार्ग वळवली जाईल.
मुंबई- दिल्ली रेल्वे मार्गावर असलेल्या पलवल येथे पंधरा दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मुंबईवरुन दिल्लीकडे जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या मेगा ब्लॉकचा फटका 40 हजार लोकांना बसणार आहे. रेल्वेने पलवल स्टेशनच्या यार्ड आणि फ्रेट कॉरिडॉरच्या न्यू पृथला रेल्वे स्थानकादरम्यान साडेसहा किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग टाकण्याचा काम सुरु केले आहे. यावर सिग्नलचे काम बाकी होते. हे पाहता या साडेसहा किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर 29 ऑगस्टपासून सिग्नलिंगचे काम सुरू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. हा ट्रॅक टाकल्यानंतर मालवाहतूक कॉरिडॉर दिल्ली-मुंबई रेल्वे विभागाशी जोडला गेला आहे.
पलवल येथे ३ ते १८ सप्टेंबरपर्यंत मेगा ब्लॉक
उत्तर रेल्वेमधील पलवल स्थानकावर मेगा ब्लॉक घेतला आहे. यामुळे जवळपास 70 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात या मार्गावरून धावणारी मुंबई – अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस, भुसावळ हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस रद्द केली आहे.
रद्द केलेल्या गाड्या अशा
- ११०५७ मुंबई-अमृतसर पठाणकोट एक्स्प्रेस ३ ते १५ सप्टेंबरपर्यंत रद्द असणार आहे.
- ११०५८ अमृतसर – मुंबई पठाणकोट एक्स्प्रेस ६ते १८ सप्टेंबरपर्यंत रद्द राहील.
- १२४०५ भुसावळ – हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस ८ ते १७ सप्टेंबर
- १२४०६ हजरत निजामुद्दीन – भुसावळ गोंडवाना एक्स्प्रेस ६ ते १५ सप्टेबरपर्यंत रद्द राहील.
काही गाड्यांचे मार्ग बदलले
मेगा ब्लॉकचा फटका लांब पल्ल्याच्या ६ गाड्यांना बसला आहे. त्यांचे मार्ग बदलले आहेत. यात मुंबई – फिरोजपूर एक्स्प्रेस ५ ते १६ सप्टेंबरपर्यंत मथुरा, अलवर, रेवारी, अस्थल बोहार मार्ग वळवली जाईल. १२१३८ फिरोजपूर मुंबई ही गाडी याच मागनि धावेल. एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस १५ सप्टेंबरला आग्रा, मितावादी, गाझियाबाद, हजरत निजामुद्दीन मार्गाने जाईल. तर हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम एक्स्प्रेस ६ ते १७ सप्टेबर या काळात गाझियाबाद, मितावादी, आग्रा मार्गे धावेल.
उद्योजकांना होणार फायदा
पलवल रेल्वे स्टेशनवर टाकण्यात येणाऱ्या नवीन रेल्वे लाईनमुळे मालवाहतूक अधिक गतीने होणार आहे. त्याचा फायदा उद्योजकांना मिळणार आहे. मुंबईरवरुन येणाऱ्या मालगाड्यांना सोनीपत आणि हरियाणाकडे जाणे अधिक सुलभ होणार आहे.