Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपतींच्या भेटीला, राजेंसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळात कोणकोणते नेते?

संभाजीराजे यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ असणार आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप नेत्यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. त्यानुसार आज ही भेट होणार आहे.

Maratha Reservation : संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपतींच्या भेटीला, राजेंसोबत सर्वपक्षीय शिष्टमंडळात कोणकोणते नेते?
खासदार संभाजीराजे आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळ
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 5:32 PM

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. तर दुसरीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहे. यावेळी संभाजीराजे यांच्यासोबत सर्वपक्षीय नेत्यांचं एक शिष्टमंडळ असणार आहे. त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप नेत्यांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा राष्ट्रपतींसमोर मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज आणि समाजाच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. त्यानुसार आज ही भेट होणार आहे. (MP Sambhaji Raje will meet President Ramnath Kovind on the issue of Maratha reservation)

संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना आपले प्रतिनिधी पाठवण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राजकीय पक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपले प्रतिनिधी पाठवले आहेत. त्यात शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत, भाजपकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण, तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांचा समावेश आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती संभाजीराजे यांनी ट्विटरद्वारे दिलीय.

राष्ट्रपतींना काय सांगणार?

यावेळी राष्ट्रपतींना एक निवेदन देण्यात येणार आहे. मराठा समाजाची स्थिती, त्यांना आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घडामोडी, मराठा आरक्षणातील कायदेशीर पेच आदी बाबी राष्ट्रपतींच्या निदर्शनास आणून दिल्या जाईल. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पेच सोडवण्यासाठी राष्ट्रपतींना विनंती केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

संभाजीराजेंचे प्रयत्न

संभाजीराजे हे सुरूवातीपासून मराठा आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत. रस्त्यावरील आंदोलनांपासून ते न्यायालयीन लढाईपर्यंत सर्व स्तरांवर ते प्रयत्नशील राहिले आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी कुण्या एकाची नसून सर्व पक्षांनी एकत्र येऊन यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची गरज संभाजीराजेंनी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पक्षीय हेव्यादाव्यांच्या पलिकडे जाऊन संभाजीराजे मोट बांधत आहेत.

बैठकीकडे लक्ष

संसदेत 127 व्या घटनादुरूस्तीवर बोलत असतानाही संभाजीराजे यांनी आरक्षणाबाबत राज्य सरकार व केंद्र सरकारची जबाबदारी स्पष्ट केली. या घटनादुरूस्तीनंतर मराठा समाजाला शैक्षणिक व सामाजिक मागास ठरवून असाधारण परिस्थिती सिद्ध करून 50% च्या वरती आरक्षण देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह खासदार संभाजीराजे घेत असलेल्या राष्ट्रपतींच्या भेटीकडे सर्व राजकीय व सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

इतर बातम्या :

‘महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले लोक काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?’

गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट! श्रीमंत दगडूशेठ गणपतीची स्थापना यंदाही मुख्य मंदिरातच

MP Sambhaji Raje will meet President Ramnath Kovind on the issue of Maratha reservation

पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल
पाळीव प्राण्यापासून सर्वच अस्वस्थ, शेलारांची मनसे नेत्यान उडवली टिंगल.
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय
दादा-पवार 15 दिवसात चारदा भेटले, काका पुतण्याच मनोमिलन होणार?घडतंय काय.
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा
साहेब तुम्ही एक पाऊल पुढे टाका अन्... ठाकरे सेनेच्या त्या बॅनरची चर्चा.
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?
मनसेच्या संदीप देशपांडेंचं शेलारांसह आदित्य ठाकरेंना पत्र, कारण काय?.
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?
राज यांचा जन्म सेनेच्या गर्भातून, ठाकरेंच्या युतीवर सामनानं काय म्हटल?.
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट
VIDEO :दौऱ्यात व्यस्त, भर उन्हात रस्त्यावर गाडी थांबवून बाप-लेकीची भेट.
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'
ठाकरे बंधूच्या युतीवर दमानियाम्हणाल्या, 'दोन हरलेली माणसं एकत्र....'.
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला
काहींच्या पोटातून मळमळ बाहेर पडतेय; संजय राऊतांचा शिंदेंसेनेला टोला.
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्...
भाजप आमदाराला पोलिसाने फोनवर घातल्या शिव्या, ऑडिओ व्हायरल अन्....
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं
ठाकरे बंधूंची युती? दोन्ही पक्षात मनोमिलनाचं वारं.