Maratha Reservation बद्दल अपडेट, दिल्लीत घडणार महत्त्वाची घडामोड, राज्यातील बड्या नेत्याची राजधानीत बैठक

Maratha Reservation | राज्यात मागच्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाबद्दल महत्त्वाची अपडेट आहे. दिल्लीत आता या आंदोलनाची दखल घेण्यात आलीय. आज दिल्लीत मराठा आरक्षणा संदर्भात महत्त्वाची घडामोड घडणार आहे. त्यासाठी एक मोठा दिल्लीत जाणार आहे. दुपारी किती वाजता ही भेट होणार? त्या बद्दल जाणून घ्या.

Maratha Reservation बद्दल अपडेट, दिल्लीत घडणार महत्त्वाची घडामोड, राज्यातील बड्या नेत्याची राजधानीत बैठक
maratha reservationImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 02, 2023 | 11:28 AM

मुंबई (गिरीश गायकवाड) : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन वातावरण तापलं आहे. आरक्षणाबद्दल मराठा समाजाच्या भावना खूप तीव्र आहेत. राज्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. दोन आमदारांची घर जाळण्यात आली. राजकीय पक्षांची कार्यालय फोडण्यात आली. रस्ते वाहतूक, महामार्ग रोखून धरले जात आहेत. काही भागात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. काल याच मुद्यावर मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं. त्यात कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. पण शांतता राखा आणि मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्याव, हा ठराव मंजूर झाला. आता महाराष्ट्रात घडणाऱ्या या घटनांची दिल्लीत दखल घेण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत आज एक अत्यंत महत्त्वाची घडामोड घडणार आहे.

भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील. मराठा आरक्षणाबाबतही या भेटीत चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आज दुपारी 3.30 वाजता ही महत्त्वाची बैठक पार पडेल. मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हालचाली वाढल्या आहे. बैठकीत नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाला तातडीने मागास ठरविणे आवश्यक आहे. त्याशिवाय केंद्राकडून काही निर्णय होणं गरजेच आहे. कालच्या सर्वपक्षीय बैठकीत या मुद्यावर सुद्धा चर्चा झाली. आरक्षणाचा कोटा वाढवण्यासाठी केंद्राकडून पावल उचललं जाण अपेक्षित आहे.

महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या किती महत्त्वाच?

आजच्या बैठकीत काय चर्चा होते? केंद्र सरकार काय निर्णय घेणार? हे महत्त्वाच आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा विचार करता, भाजपाला मराठा समाजाची नाराजी परवडणारी नाही. उत्तर प्रदेश खालोखाल महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक 48 जागा आहे. महाराष्ट्रातून 45 जागा जिंकण्याच भाजपाच उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबतत काही सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील या घडामोडींची केंद्राकडून आता गंभीर दखल घेतली जाईल.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.