Bangladeshi Munir : 75 बांग्लादेशी मुलींशी केलं लग्न, भारतात आणलं मग.. या 28 वर्षीय गुन्हेगाराचे गुन्हे ऐकून बसेल धक्का

या 75 पत्नी आहेत तरी कुठे, असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असणार. या प्रश्नाचे उत्तर इंदूर पोलिसांनी दिल्यानंतर दुसरा मोठा धक्का अनेकांना बसला आहे. मुनीर केवळ सीमा पार करण्यासाठी या मुलींशी लग्न करीत असे. त्यानंतर त्यांना घेऊन तो भारतात येत असे. त्यानंतर त्या तरुणींशी काय करीत होता, हे जाणून घ्या.

Bangladeshi Munir : 75 बांग्लादेशी मुलींशी केलं लग्न, भारतात आणलं मग.. या 28 वर्षीय गुन्हेगाराचे गुन्हे ऐकून बसेल धक्का
75 बांग्लादेशी तरुणींशी केले लग्न Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 08, 2022 | 7:22 PM

इंदूर – 28 वर्षांच्या एका तरुणाने 75 लग्न (75 marriages)केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या तरुणाचे नाव आहे मुनीर उर्फ मुनीरुल, (Munir )याला सूरवरुन अटक केल्य़ानंतर, त्याच्या चौकशीत त्याने केलेल्या विवाहांची संख्या ऐकून खुद्द पोलीसही चक्रावले. 75 लग्न करणाऱ्या या तरुणाची गु्न्ह्यांची गाथा ऐकल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. बांग्लादेशी (Bangladeshi girls)मुलींना भारतात आणण्यासाठी मुनीर त्यांच्याशी लग्न करीत असे. अशा स्थितीत या 75 पत्नी आहेत तरी कुठे, असा प्रश्न तुमच्या मनात उपस्थित झाला असणार. या प्रश्नाचे उत्तर इंदूर पोलिसांनी दिल्यानंतर दुसरा मोठा धक्का अनेकांना बसला आहे. मुनीर केवळ सीमा पार करण्यासाठी या मुलींशी लग्न करीत असे. त्यानंतर त्यांना घेऊन तो भारतात येत असे. त्यानंतर त्या तरुणींशी काय करीत होता, हे जाणून घ्या.

200 तरुणी देहविक्री व्यवसायात

मुनीर उर्फ मुनीरुल याला ऑक्टोबर 2021 साली सेक्स रॅकेट प्रकरणात इंदूर पोलिसांनी सूरतमधून अटक केली. इंदूरमध्ये अटक करण्यात आलेल्या काही बांग्लादेशी तरुणींच्या चौकशीत याचे नाव समोर आले होते. या मुलींना बांग्लादेशातून सीमा पार करुन मुनीर यानेच भारतात आणले होते. मुनीरने बांग्लादेशातून आणलेल्या एक-दोन नाही तर सुमारे 200 मुलींना भारतात देह विक्रीच्या धंद्यात लोटले होते. या 200 पैकी 75 मुलींशी त्याने स्वता विवाह केला होता. त्याला अटक करण्यात आल्यानंतर ही माहिती पुढे आली. त्यामुळे तपास यंत्रणाही हादरली. तो प्रत्येक महिन्याला बांग्लादेशातून मुली भारतात आणत होता. सीमेवर तपासणीत या मुली आपल्या पत्नी असल्याचे तो भासवित असे. त्याचबोरबर त्यांच्याशी लग्न झालेले फोटोही तो सीमेवरील तपास अधिकाऱ्यांना दाखवत होता. त्या फोटोत तो त्यांचा नवरा असे.

मुंबई, इंदूर, सूरतमध्ये पसरले होते जाळे

मुनीर या सगळ्यात फारच तरबेज होता. अनेक सरकारी यंत्रणांना चकवा देत तो परदेशी मुलींना भारतात आणत होता. प्रत्येक कागदपत्रावर त्याची वेगवेगळी नावे असत. मुंबई, सूरत आणि इंदूर सारख्या मोठ्य़ा शहरांत सेक्स रॅकेटमध्ये सामील असलेल्यांना तो या मुली विकत असे. मुनीरने आणलेल्या मुलींचे ग्राहक हे हायप्रोफाईल लोक होते. त्यामुळे त्याला या धंद्यात जास्त मागणीही होती.

हे सुद्धा वाचा

पोरस बॉर्डवरुन मुलींना आणत असे

सीमेवरील आणि राज्यांच्या पोलिसांना चकवा देत तो या मुलींना भारतात आणीत असे. भारत-बांग्लादेशातील पोरस बॉर्डरवरुन तो या मुलींना देशात आणीत होता. बॉर्डरवर त्याचे काही ठरलेले एजंट होते, त्यांना तो मोठी रक्कमही देत असे. हीच लोकं त्याच्यासाठी कागदपत्रे तयार करीत असतं. ज्या मुलींना आणण्यात अडचणी येत असत, त्यांच्याशी मुनीर लग्न करीत असे. त्याने इतक्या मुली आणल्या पण कुणालाही साधी याची कुणकुणही लागली नाही, याचे आश्चर्य आहे.

21 बांग्लादेशी तरुणींना अटक केल्यानंतर नाव समोर

दीड वर्षांपासून इंदूर पोलिसांनी 21 बांग्लादेशी तरुणींना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मुनीरसह इतर नावे समोर आली होती. त्यानंतर मुनीरच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती,. त्यावेळी पळून जाण्यातही मुनीर यशस्वी ठरला होता. त्यानंतर त्याला सूरतमधून अटक करण्यात आली होती.

मुनीर बांग्लादेशातील रहिवासी

मुनीर हाही स्वता बांग्लादेशचा रहिवासी होता. सध्या तो इंदूरच्या जेलमध्ये अटकेत आहे. बांग्लादेशी तरुणींना भारतात आणण्यासाठी मोठे नेटवर्क काम करीत होते. मुलींना भारतात आणल्यानंतर त्यांना आधी कोलकत्यात आमले जात असे मग त्यांना मुंबईत हलवण्यात येत असे.

मुंबईत मुलींचे होत असे ट्रेनिंग

बांग्लादेशातून आणलेल्या मुली मुनीर मुंबईत विकत असे. या मुली फक्त त्याच्या कागदोपत्री पत्नी असत. त्यांना मुंबईत आणल्यानंतर त्यांचे पर्सनलिटी डेव्हलपमेंटचे ट्रेनिंग होत असे. त्यानंतर देशभरात गरजेप्रमाणे या मुलींना पाठवण्यात येत असे.

बांग्लादेशातून आणलेल्या मुली गरीब

बांगलादेशातून आणलेल्या मुली या गरीब घरातील असत. मुनीर आणि त्याचे साथीदार याचाच फायदा घेत असत. त्यांच्या कुटुंबीयांना पैशांचे लालूच दाखवून या मुलींना ते जाळ्यात ओढत. बॉर्डरपासून जवळ असलेल्या गावात मुनीरची माणसे हे काम करीत असत. त्यानंतर या मुलींना भारतात आणून त्यांना देहविक्रीच्या धंद्यात टाकत असे.

30 हजार ते दीड लाख मुलींची किंमत

या मुली मुनीर 30 हजार ते दीड लाखांपर्यंत विकत असे. यातील अनेक मुलींच्या पतीच्या नावी मुनीर याचा उल्लेख असे. भारताचे खोटे नागरिकत्वही या तरुणींना देण्यात येत असे. त्यामुळे त्या पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांपासून बचाव करुन घेत असत. यातील अनेक मुली या स्पा सेंटर्समध्ये काम करीत होत्या. इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, मुंबई, पुणे, बंगळुरु, अहमदाबाद, सूरतमध्ये या मुली काम करीत असत.

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.