कोण आहे सैफुल्लाह कसुरी ?..पहलगाम हल्ल्यामागचं मोठं षडयंत्र उघड, कोणतीही आहे ही क्रुर संघटना…
कश्मीराला ३७० कलमापासून मुक्तता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतरचा हा आतापर्यंत सर्वात मोठा आघात कश्मीरवर झाला आहे. पहलगामवरील दहशतवादी हल्ल्यात २६ हून अधिक सर्वसामान्य लोकांचा बळी गेल्याचे उघड झाल्याने दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर पोहचले आहेत...

पहलगाम हल्ल्याने अवघा देश सुन्न झाला आहे. या हल्ल्यात २६ हून अधिकजण ठार झाल्याचे म्हटले जात आहे. या हल्ल्याच्या बळीतांमध्ये एका इस्रायली आणि इटलीच्या नागरिकाचाही सहभाग असल्याचं म्हटलं जात आहे. आता या हल्ल्यामागील आतापर्यंतची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर- ए- तैय्यबाने एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात काश्मीरच्या अनेक पर्यटन स्थळांची रेकी केल्याचे उघडकीस आले आहे. यात पहलगाम येथील हॉटेल होते.यातून आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेचा म्होरक्याचं नाव घेतले जात आले आहे.
नंदनवन कश्मीर पुन्हा एकदा पाकिस्तानी अतिरेक्यांच्या हिंसक अत्याचाराला बळी पडले आहे. पहलगामवर अत्यंत नृशंस असा हल्ला झाला आहे. मंगळवारी सकाळी पहलगाम येथे प्रती स्वित्झर्लंड म्हटल्या जाणाऱ्या बैरसन भागातील पठारावर पर्यटक कश्मीरच्या सहलीचा कुटुंबांसह आनंद घेत असताना हमासने जसा इस्रायलमध्ये शिरकाव करीत रक्ताचे सडे पाडले तसा हा हल्ला झाल्याचे म्हटले जात आहे.
कोण आहे सैफुल्लाह कसुरी ?
विशेष म्हणजे पर्यटकातील पुरुषांना त्याचे नाव आणि धर्म विचारात अतिरेक्यांनी एकेक करुन टीपल्याने या हल्ल्यामागे कोणती संघटना असावी यावर तर्क वितर्क सुरु असतानाच इसिसचेही नाव पुढे आले असताना आता लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्याचा मास्टरमाईंड लष्कर-ए-तैयबाचा उपप्रमुख सैफुल्लाह कसुरी असल्याचे म्हटलं जात आहे. लष्कर – ए- तैयबाचा म्होरक्या हाफिज सईद याचा सैफुल्लाह कसुरी हा उजवा हात असल्याचे म्हटले जात आहे. सैफुल्लाह कसुरी याला सैफुल्लाह साजिद जट, अली, हबीबुल्लाह आणि नौमान या नावांनीही ओळखले जाते.
पर्यटकांना कलमा पढायला लावला…?
कश्मीर पुन्हा रक्तरंजित झाले आहे. या शिरलेल्या अतिरेक्यांनी पर्यटकांना कलमा पढायला लावल्याचेही उघडकीस आले आहे. अशा प्रकारचे कृत्य ओसामा बिन लादेनच्या अलकायदा या संघटेतून फूटून उदयास आलेल्या इसिससारख्या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी करत आले आहेत.
परदेशी नागरिकही ठार ?
पहलगामच्या पठारावर पर्यटक सकाळच्यावेळी पडलेल्या उन्हाचा आस्वाद घेत भेलपुरी, पाणीपुरी खात असतानाच अतिरेक्यांनी पर्यटकांना टार्गेट केले आहे. केवळ पुरुषांना नाव विचारत ठार केले. महिलांना मात्र आश्चर्यकारक रित्या सोडले आहे. या हल्ल्यात परदेशी नागरिकांही हुडकून ठार केले आहे. यात इस्रायल आणि इटलीच्या नागरिकाचा देखील समावेश असल्याचे म्हटले जात असले तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या हल्ल्यातील पर्यटकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहे..ते खालील प्रमाणे आहेत…
पोलिसांनी जारी केलेले संपर्क क्रमांक – 9596777669, 01932225870 (9419051940 व्हाट्सएप) नंबर जारी किए हैं.
पहलगाममध्ये एनआएचे पथक..
एनआयएची टीम पहलगाम दाखल होत आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला सौदीचा दौरा अर्धवट सोडून भारताकडे निघाले आहेत.तसेच सैन्यदल प्रमुख व्ही. के. जम्मूत कश्मिरात दाखल होत असल्याची माहीती आहे. तसेच कश्मीरच उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील दाखल झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्म्यू यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.