मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण होण्यास मुस्लिमच जबाबदार ; भाजप-आरएसएसची चूक नाही…

विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे लोक मोहीम राबवून मुस्लिम मुलींना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आमिष दाखवण्याचे कामही ते करत आहेत.

मुस्लिमांविरुद्ध द्वेष निर्माण होण्यास मुस्लिमच जबाबदार ; भाजप-आरएसएसची चूक नाही...
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 11:33 PM

नवी दिल्ली : इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल या राजकीय पक्षचे संस्थापक मौलाना तौकीर रझा यांनी देशात सुरू असलेल्या अनेक समस्यांवर आपले परखड मत मांडले आहे. देशात सलोखा राखण्यासाठी सरकारने ज्याप्रमाणे इस्लामिक संघटना सिमीवर बंदी घालून कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेवरही कारवाई व्हायला हवी असं मत त्यांनी व्यक्त केले आहे. देशात निर्माण होत असलेले हिंदू-मुस्लिम वातावरण अत्यंत धोकादायक असल्याची चिंताही मौलाना यांनी व्यक्त केली आहे.

मुस्लिमांबद्दल जो द्वेष पसरत असून त्याला आरएसएस किंवा भाजप नाही तर मुस्लिम देखील जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.मौलाना तौकीर म्हणाले की, आजचा मुस्लिम चुकीच्या मार्गावर चालला आहे, त्यामुळेच तो द्वेषाचा बळी ठरत आहे.

यासाठी इतर कोणालाही दोष देऊ नये. मौलाना यांनी म्हटले आहे की,मुस्लिमांवर धर्मांतराचे आरोप केले जातात, तर हिंदूंना मुस्लिम बनवण्यासाठी कोणतीही मोहीम चालवली जात नाही.

मौलाना तौकीर यांना गाझियाबादमधील ऑनलाईन धर्मांतर प्रकरणाबाबत सवाल केला असता त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, या प्रकरणाचा विनाकारण बाऊ केला जात आहे.

लहान मुलांच्या खेळातून कोणताही गंभीर मुद्दा उपस्थित करण्याची गरज नाही. तसेच लहान मुलाला मुस्लिमही कोणीबनवू शकत नाही असंही ते म्हणाले. मुलाच्या पालकांची संमती असल्याशिवाय मुलाला मुस्लिम बनवता येत नाही.पैशाचे आमिष दाखवून एखाद्याला मुस्लिम बनवण्याइतका पैसा मुस्लिम समाजाकडे नाही असंही त्यांनी मत व्यक्त केले.

धर्मांतराच्या मुद्द्यावर मौलाना यांनी पुन्हा एकदा मत व्यक्त करत कोणीही इतक्या सहजतेने मुस्लिम बनवू शकत नाही. त्यांना मुस्लिम बनवणे हे उलेमांचे काम आहे, ते कोणीही स्वत: करू शकत नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी धर्मांतरावर परखड मत व्यक्त केले.

मौलाना तौकीर यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे लोक मोहीम राबवून मुस्लिम मुलींना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना आमिष दाखवण्याचे कामही ते करत आहेत.

तर मौलाना यांनी सांगितले की, या दोन्ही संघटना मुस्लिम मुलींना खुल्या मंचावरून घरी परतण्यास सांगतात. लव्ह जिहाद हा खोटा आरोप आहे पण ‘भगवा लव्ह ट्रॅप’ ही वस्तुस्थिती असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.