महाराष्ट्रातील या वाघिणीने 16 तासांत बांधला 190 फुटांचा पूल, वायनाडमुळे देशभरात चर्चेत आलेल्या कोण आहेत मेजर सीता शेळके

who is major sita shelke:बेली पुलाचे बांधकाम 31 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता सुरू झाले. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता पूर्ण झाले. पुलाची ताकद तपासण्यासाठी लष्कराने आधी आपली वाहने नदीच्या पलीकडे नेली होती. हा बेली ब्रिज वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई आणि चुरलमला या सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांना जोडण्यास मदत करणारा ठरला.

महाराष्ट्रातील या वाघिणीने 16 तासांत बांधला 190 फुटांचा पूल, वायनाडमुळे देशभरात चर्चेत आलेल्या कोण आहेत मेजर सीता शेळके
who is major sita shelke:
Follow us
| Updated on: Aug 05, 2024 | 10:39 AM

who is major sita shelke: केरळमधील वायनाड पुणे जिल्ह्यातील माळीण सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. 2014 मध्ये माळीण गाव दरडीखाली दाबले गेले होते. त्यानंतर आता 2024 मध्ये वायनाड जिल्ह्यामधील चार गावांमध्ये दरडी कोसळल्या. त्यामुळे 346 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेचा तडाखा बसलेल्या लोकांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर धावून आले आहे. लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपच्या जवानांनी अनेकांना वाचवले. त्यांच्यापर्यंत मदत पोहचवली आहे. त्या ठिकाणी तातडीने पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहे. यामध्ये चूरालमला येथे विक्रमी वेळेत 190 फुटांच्या पुलाचे काम महाराष्ट्रातील वाघिणीने केले. तिच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कामाची सर्वत्र चर्चा होत आहे. महाराष्ट्रातील त्या महिलेचे नाव आहे मेजर सीता शेळके. या मराठमोळ्या महिला लष्करी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली चूरलमामला येथील उफनती नदीवर 190 फूट लांबीचा पुलाचे काम केवळ 16 तासांत पूर्ण केला.

70 जणांच्या टीमची 16 तासांत कामगिरी फत्ते

वायनाडमधील मुंडक्काई आणि चुरालमला या ठिकाणी दरड कोसळ्यानंतर मोठमोठे दगड, मातीखाली अनेक घरे दबली गेली. यामुळे शेकडो लोक अडकून पडले. बचाव कार्य करताना खराब हवामानाशी सामना करावा लागत होता. त्यामुळे मदत पोहचवण्यास अनेक अडथळे येत होते. त्यामुळे त्या ठिकाणी पूल बांधण्याची गरज होती. मेजर सीता शेळके आणि त्यांच्या 70 जणांच्या टीमने 16 तास न थांबता पुलाचे काम केले. त्यामुळे बचाव पथक मुंडक्काई गावापर्यंत जाऊ शकले. कोण आहेत या मेजर सीता शेळके जाणून घेऊ या…

हे सुद्धा वाचा

who is major sita shelke

कोण आहेत या मेजर सीता शेळके…

मेजर सीता शेळके 2012 मध्ये भारतीय सैन्य दलात सहभागी झाल्या. त्या सध्या मद्रास अभियांत्रिकी ग्रुप मेजर म्हणून तैनात आहे. त्या अहमदनगर जिल्ह्यातील आहे. त्यांनी चेन्नई ओटीए येथून प्रशिक्षण पूर्ण केले. भारतीय लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटाच्या 70 सदस्यीय संघात मेजर सीता शेळके या एकमेव महिला अधिकारी आहेत.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल अन्…

मेजर सीता शेळके यांचे पुलावर उभे असलेले छायाचित्र शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यांचा फोटो शेअर करत एका यूजरने लिहिले की, ‘मेजर सीता शेळके आणि इंजिनिअर रेजिमेंटचा आम्हाला अभिमान आहे. वायनाडमधील बेली ब्रिज 16 तासांपेक्षा कमी वेळात यशस्वीपणे बांधणे हे अविश्वसनीय आहे!’ त्याचवेळी, स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये, या बचाव कार्याला गती दिल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले.

who is major sita shelke

असे झाले पुलाचे काम

बेली पुलाचे बांधकाम 31 जुलै रोजी रात्री 9:30 वाजता सुरू झाले. 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता पूर्ण झाले. पुलाची ताकद तपासण्यासाठी लष्कराने आधी आपली वाहने नदीच्या पलीकडे नेली होती. हा बेली ब्रिज वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई आणि चुरलमला या सर्वाधिक प्रभावित क्षेत्रांना जोडण्यास मदत करणारा ठरला. हे 24 बेली ब्रिज इरुवाझिंजीपुझा नदीवर बांधण्यात आले आहेत.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.