भारताची मोठी झेप, MEIL कडून खोल समुद्रात खनिज तेल उत्पादन करणाऱ्या स्वदेशी यंत्रणेची निर्मिती

भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतलीय. मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (Megha Engineering Infrastructure Limited - MEIL) अहमदाबादमध्ये समुद्रातून खनिज तेल उत्खननासाठी उपयोगात येणाऱ्या रिग्ज (Rigs) स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन निर्मिती केलीय.

भारताची मोठी झेप, MEIL कडून खोल समुद्रात खनिज तेल उत्पादन करणाऱ्या स्वदेशी यंत्रणेची निर्मिती
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 10:14 AM

अहमदाबाद : भारताने तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतलीय. मेघा इंजिनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने (Megha Engineering Infrastructure Limited – MEIL) अहमदाबादमध्ये समुद्रातून खनिज तेल उत्खननासाठी उपयोगात येणाऱ्या रिग्ज (Rigs) स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करुन निर्मिती केलीय. एमईआयएलच्या या नव्या यशामुळे भारताचं मेड इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट पूर्ण करण्यास मोठा हातभार लागणार आहे. बुधवारी (25 ऑगस्ट) अहमदाबादमध्ये एमईआयएलने पहिली स्वदेशी Rigs चं तेल उत्पादक सरकारी कंपनी ओएनजीसीला (ONGC) हस्तांतरण केलं. भारतासाठी तंत्रज्ञान स्वालंबनात ही मोठी उपलब्धता मानली जात आहे.

अत्यंत खोल समुद्रात खनिज तेल उत्पादनात Rigs ची भूमिका महत्त्वाची असते. याचं तंत्रज्ञान अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीचं असतं. असं असताना ही यंत्रणा उभी करण्याचं तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील मोजक्या देशांपैकी एक बनलाय. यामुळे जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढणार आहे. एमईआयएलने Drillmec चे प्रमुख बोमारेड्डी (Bommareddy Srinivas) यांच्या उपस्थितीत ही यंत्रणा हस्तांतरीत केली. यावेळी ऑईल रिग्ड विभागाचे प्रमुख एन. कृष्णाकुमार (Oil Rigs Head N. Krishna Kumar), उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी (P. Rajesh Reddy) हेही उपस्थित होते.

स्वदेशी रिग्जची निर्मिती करणारी एमईआयएल भारतातील पहिली खासगी कंपनी

एमईआयएलला ओएनजीसीकडून एकूण 47 तेल उत्पादन करणाऱ्या रिग्जच्या निर्मितीचं काम मिळालं आहे. याची एकूण किंमत 6,000 कोटी रुपये आहे. याचाच भाग म्हणून एमईआयएलने पहिली रिग्ज ओएनजीसीकडे सुपुर्त केली. यासह एमईआयएल देशातील पहिली खासगी कंपनी बनलीय जिने खनिज तेल उत्पादन करणाऱ्या रिग्जची स्वदेशी तंत्रज्ञानावर निर्मिती केलीय.

एमईआयएलच्या तेल उत्पादक रिग्जचं वैशिष्ट्य काय?

MEIL ने बनवलेल्या या रिग्ज जुन्या रिग्जच्या तुलनेत खूप विकसित आहे. त्यामुळेच त्या कमीत कमी उर्जेवर अधिक क्षमतेने काम करु शकतील. त्यामुळे खनिज तेल उत्पादनाचा वेग वाढून खर्च कमी होणार आहे. या रिग्जची क्षमता 1,500 HP असेल. ही यंत्रणा 4,000 मीटर खोलीपर्यंत अगदी सहजपणे खोदकाम करु शकेल. या रिग्ज आधुनिक तंत्रज्ञानामुळे जवळपास 40 वर्षे खनिज तेल उत्पादन करु शकतील.

एमईआयएलची दुसरी रिग्ज गुजरातमधील धमसना गावातील KLDDH oil well येथे बसवण्यात येणार आहे. MEIL ओएनजीसीला एकूण 47 रिग्जपैकी 23 रिग्जचा पुरवठा मार्च 2022 पर्यंत करणार आहे. याआधी भारताला या तंत्रज्ञानासाठी आणि यंत्रणेसाठी इतर देशांवर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र, आता भारत याबाबत स्वयंपूर्ण झालाय. भारताच्या तेल उत्पादनात हे योगदान देता आल्याबद्दल एमईआयएलचे उपाध्यक्ष पी. राजेश रेड्डी यांनी आनंद आणि समाधान व्यक्त केलंय. तसेच या कामाबद्दल अभिमान व्यक्त केलाय.

हेही वाचा :

Kaleshwaram Project | जगाच्या इतिहासात अद्भुत अभियांत्रिकी चमत्कार, कलेश्वरम प्रकल्पाविषयी ‘डिस्कव्हरी’वर लघुपट

कोरोना लढाईत MEIL चं मोठं योगदान, आधी ऑक्सिजन, आता तब्बल 3000 बेडचं कोव्हिड रुग्णालय

कंपनीचे सर्व कामं थांबवत ऑक्सिजन पुरवठ्याला प्राधान्य, MEIL कडून युद्धपातळीवर प्रयत्न, थायलंडमधून 11 टँकर्सची आयात

व्हिडीओ पाहा :

Megha Engineering Infrastructure Limited – MEIL indigenously manufactured oil rigs for ONGC

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.