Shillong violence : मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला, गृहमंत्र्यांचा राजीनामा

मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा (Chief Minister Conrad Sangma) यांच्या घरावर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. रविवारी ही घटना घडली. काही अज्ञातांनी थेट मुख्यमंत्री कोनराड राहात असलेल्या बंगल्याकडे धाव घेत, पेट्रोल बॉम्ब फेकले.

Shillong violence : मेघालयात मुख्यमंत्र्यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब हल्ला, गृहमंत्र्यांचा राजीनामा
Meghalaya Chief Minister's Home Attacked
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 2:07 PM

शिलाँग : मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड के संगमा (Chief Minister Conrad Sangma) यांच्या घरावर अज्ञातांनी पेट्रोल बॉम्ब फेकले. रविवारी ही घटना घडली. काही अज्ञातांनी थेट मुख्यमंत्री कोनराड राहात असलेल्या बंगल्याकडे धाव घेत, पेट्रोल बॉम्ब फेकले. रात्री सव्वा दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पेट्रोलने भरलेल्या दोन बाटल्या मुख्यमंत्र्यांच्या घराच्या दिशेने फेकण्यात आल्या.

दरम्यान, याप्रकरणात कोणालाही दुखापत झालेली नाही. पेट्रोलने भरलेली एक बाटली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याच्या पुढच्या बाजूला तर दुसरी मागच्या बाजूला फेकण्यात आली. पेटती बाटली फेकल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवलं.

स्वातंत्र्य दिनी मेघालयची राजधानी शिलाँगसह परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने शिलाँगमध्ये कर्फ्यू लावला. इतकंच नाही तर मेघालयातील चार जिल्ह्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या.

गृहमंत्र्यांचा राजीनामा

दरम्यान या सर्व हिंसाचारात मेघालयचे गृहमंमत्री लखमेन रिंबुई यांनी राजीनामा दिला आहे. एका उग्रवाद्याला पोलिसांनी गोळी मारुन ठार केलं. त्यानंतर सर्वत्र हिंसाचाराला सुरुवात झाली.

गृहमंत्री रिंबुई यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं आहे की, “बंदी असलेली संघटना नॅशनल लिबरेशन काऊन्सिलचा महासचिव चेरिस्टरफील्ड थांगखियू याने आत्मसमर्पण केलं असतानाही त्याला गोळी मारण्यात आली, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी”

थांगखियूला 13 ऑगस्टला गोळी मारुन त्याला ठार करण्यात आलं. मेघालयात झालेल्या साखळी स्फोटातील आयडी स्फोटानंतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापेमारी केली होती. त्यावेळी त्याने पोलिसांवर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

संबंधित बातम्या 

Afghanistan Taliban War LIVE Updates: अफगाणिस्तानमध्ये विमानतळावर गोळीबार, संयुक्त राष्ट्रांची तातडीची बैठक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.