ऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, ‘या’ राज्यांना मोफत ऑक्सिजन पुरवणार

MEIL कंपनीने तेलुगु राज्यांमध्ये मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव MEIL कंपनीने तेलंगणा सरकारला दिला आहे.

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी MEIL मैदानात, 'या' राज्यांना मोफत ऑक्सिजन पुरवणार
ऑक्सिजन
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 11:17 AM

हैदराबाद :  कोरोनाचा उद्रेक (Corona cases) आणि ऑक्सिजनची (Oxygen) कमतरता पाहता, देशातील आघाडीची कंपनी मेघा इंजिनिअरिंग (Megha Engineering & Infrastructures Limited) अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) मदतीसाठी मैदानात उतरली आहे. या कंपनीने तेलुगु राज्यांमध्ये मोफत ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव MEIL कंपनीने तेलंगणा सरकारला दिला आहे. (MEIL to augment supply of oxygen by 3.5 lakh liters per day in Covid19 hit Telugu States )

इंजिनिअरिंग क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या या कंपनीने, दररोज 7 हजार लीटर क्षमतेचे 500 ते 600 ऑक्सिजन सिलेंडर निर्मितीची योजना बनवली आहे. यानुसार दररोज जवळपास 3 लाख 50 हजार लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता कंपनीची आहे.

MEIL कंपनीला निजामच्या आयुर्विज्ञान संस्था  50 सिलेंडर, सरोजिनी देवी नेत्र चिकित्सालय 200 सिलेंडर, अपोलो आयुर्विज्ञान संस्था  (100) आणि हैदराबाद केयर हाई-टेक रुग्णालय 50 सिलेंडर ऑक्सिजन भरुन देण्याची मागणी आली आहे.

या रुग्णालयांत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन बेडची संख्याही वाढवण्यात आली आहे.

महत्त्वाचं म्हणजे DRDO च्या मदतीने MEIL कंपनी आता 30-40 ऑक्सिजन निर्मिती संयंत्र निर्मितीचीही तयारी करत आहे. ही संयंत्रं लढाऊ विमानांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑन बोर्ड ऑक्सिजन उत्पादनाच्या तंत्रज्ञानावर आधारित असतील. ज्याव्दारे मिनिटाला 150-1000 लिटर ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते.

MEIL सध्या दिवसा 30 मेट्रिक टन  क्रायोजेनिक ऑक्सिजन लिक्विडीफिकेशन संयंत्राची निर्मिती करत आहे. उद्यापासून त्यातून ऑक्सिजन निर्मिती सुरु होईल. क्रायोजेनिक ऑक्सिजनचं रुपांतर मेडिकलसाठी लिक्विड ऑक्सिजनमध्ये केलं जाईल.

स्पेनमधून आयात करण्याची तयारी

सूत्रांच्या मते, जर राज्य सरकारांना गरज असेल तर, MEIL कंपनी आपल्या स्पेनमधील युनिटमधून 10-15 क्रायोजेनिक ऑक्सिजन टँक आयात करण्यासाठी तयार आहे.

MEIL ची ऑक्सिजन पुरवठा योजना

  • MEIL कंपनी रुग्णालयांना 500-600 ऑक्सिजन सिलेंडकर मोफत देणार
  • लिक्विड ऑक्सिजन जवळपास 3.5 लाख लिटर असेल, जे पूर्णत: मोफत दिलं जाईल
  • MEIL ने तेलंगणा सरकारला आपला प्रस्ताव पाठवला आहे.
  • DRDO च्या सहयोगाने MEIL 40 ऑक्सिजन उत्पादन संयंत्रांची निर्मिती करणार

संबंधित बातम्या  

Zojila tunnel : भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरु होणार, MEIL ला जोजिला बोगद्यासह 33 किमी रस्त्याचं कंत्राट 

MEIL ची स्वदेशी प्रगत तंत्रज्ञानावर आधारीत ऑइल ड्रिलिंग रिग्जची निर्मिती, 4 किलोमीटर खोल तेल विहीर काढण्याची क्षमता

(MEIL to augment supply of oxygen by 3.5 lakh liters per day in Covid19 hit Telugu States )

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.