मेक्सिकोच्या सिनेट अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी, व्हिडिओची जगभरात चर्चा

दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये G20 देशांच्या P20 परिषदेदरम्यान मेक्सिकोच्या सिनेटच्या अध्यक्षा अना लिलिया रिवेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वाद ही दिला. या व्हिडिओची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

मेक्सिकोच्या सिनेट अध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना बांधली राखी, व्हिडिओची जगभरात चर्चा
Follow us
| Updated on: Oct 14, 2023 | 1:23 PM

नवी दिल्ली | P20 परिषदेत सहभागी होण्यासाठी G20 देशांचे वक्ते दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात जागतिक दहशतवादापासून लोकशाहीतील महिलांच्या सहभागापर्यंतच्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपली भूमिका आणि मते मांडली. दहशतवादाच्या मुद्द्यावर एकमत नसणे हे दुर्दैवी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आज आपण दहशतवादाविरोधात एकत्र काम केले पाहिजे, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी सर्व प्रतिनिधींना केले आहे.

पंतप्रधान मोदींना बांधली राखी

P20 कॉन्फरन्सचा एक अनोखा व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मेक्सिकोच्या सिनेटच्या अध्यक्षा अना लिलिया रिवेरा पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधताना दिसत आहेत. अना लिलिया रिवेरा P20 परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आल्या आहेत. राखी बांधल्यानंतर अना लिलिया रिवेरा यांनी पंतप्रधान मोदींचे हात जोडून स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी मेक्सिकन सिनेट अध्यक्षांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वादही दिला.

P20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवाद किती गंभीर धोका आहे हे आता जगाला कळू लागले आहे. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद, त्याचे कारण काहीही असो, त्याचे स्वरूप काहीही असो, मानवतेसाठी मोठा धोका आहे. दहशतवादाविरुद्धची लढाई आपण सुरूच ठेवली पाहिजे.

P20 परिषद म्हणजे काय?

P20 हा G20 देशांच्या संसदेच्या संसदीय अध्यक्षांचा एक गट आहे. P20 गटाची ही नववी बैठक आहे. हे 2010 मध्ये कॅनडाच्या G20 अध्यक्षांच्या काळात सुरू झाले होते. P20 हे सध्याच्या जगासमोरील उदयोन्मुख आव्हानात्मक समस्यांवर चर्चा करण्याचे व्यासपीठ आहे. हे G20 सदस्य देशांचे प्रयत्न आणि संबंधित धोरणांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्याची संधी देते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.