VIDEO : मिग 21 विमान कोसळलं; 4 ग्रामस्थांचा मृत्यू; पायलटने विमानातून उडी घेतल्याने…

राजस्थानच्या हनुमानगड येथे मिग 21 हे विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली.

VIDEO : मिग 21 विमान कोसळलं; 4 ग्रामस्थांचा मृत्यू; पायलटने विमानातून उडी घेतल्याने...
jet fighter crashImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 08, 2023 | 12:03 PM

जयपूर : राजस्थानच्या हनुमानगड येथे मिग 21 हे विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका महिलेचा समावेश आहे. तर एकजण जखमी झाला आहे. हनुमानगड येथील बहलोल नगर गावात ही दुर्घटना घडली. विमान कोसळत असताना पायलटने विमानातून उडी घेतली. त्यामुळे तो बचावला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली आहे.

हे सुद्धा वाचा

आज सकाळी ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं जात आहे. हे हवाई दलाचं विमान सूरतगडला जात होतं. विमानात बसल्याने अपघात होणार असल्याचं पायलटच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने तात्काळ पॅराशूट घालून विमानातून उडी मारली. त्यामुळे विमानातील दोन्ही पायलट सुरक्षित बचावले. त्यांना काही झालं नाही. मात्र, नंतर विमान हनुमागड येथे कोसळलं.

बघ्यांची गर्दी

हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघातात विमानाचा चक्काचूर झाला आहे. तसेच या अपघातात चार ग्रामस्थांचा मृत्यू झाला आहे. विमानाच्या ढिगाऱ्यातून आग आणि धूर निघत होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. विमान अपघाताची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरू केलं. विमान पाहण्यासाठी या परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून जमावाला पांगवण्याचं काम सुरू आहे.

अनर्थ टळला

विमानाचा अपघात होणार असल्याचं कळाल्यानंतर पायलटने हे विमान गावाच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. दाट वस्तीच्या ठिकाणी विमान अपघात झाला असता तर अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका घरावर हे विमान कोसळलं. तेव्हा घराच्या बाहेर मुलं खेळत होती.

15 मिनिटात अपघात

या फायटर जेटने सूरतगड एअर बेसवरून उड्डाण घेतलं होतं. उड्डाण घेतल्यानंतर 15 मिनिटात तांत्रिक बिघाडामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटलं. तरीही या पायलटने विमानाला गावापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही या अपघातात एक महिला ठार झाली आहे. ही महिला जनावरांसाठी चारा आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला.

'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल
'राऊतांना सात जन्म घ्यावे लागतील', 'त्या' टीकेवरून गोगावलेंचा हल्लाबोल.
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार
आनंदाची बातमी, लवकरच प्रवाशांच्या सेवेत मुंबई मेट्रो 3 दाखल होणार.
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'
अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर उदयनराजे म्हणाले, 'गोळ्या घालण्यापेक्षा..'.
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या
लाभार्थी होण्यासाठी 'बहिणीं'चे मोठे हाल, रात्रभर बँकेच्या बाहेर उभ्या.
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?
देशभरात पहिल्या क्रमांकावर 'देवाचा न्याय'... ट्विटरवर का होतोय ट्रेंड?.
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर
जरांगेंची प्रकृती खालावली, पाणी पिण्यास नकार; महिलांना अश्रू अनावर.
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल
सिद्धीविनायक मंदिरातील प्रसादाच्या टोपलीत उंदरं? व्हिडीओ होतेय व्हायरल.
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले
राऊत मूर्ख-बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवरील टीकेवर शिरसाट भडकले.
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार
आता दुसऱ्या शिंदेंचा एन्काऊंटर..; संजय राऊत यांचा जिव्हारी लागणारा वार.
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'
जलील यांच्या रॅलीवर राणेंचा टोला, '...इतकं आम्ही रोज नाश्त्याला खातो'.