खाणी आणि खनिजांवरील नवा कायदा संसदेत मंजूर, काय आहेत मोठे बदल?

मोदी सरकारचं खाणी आणि खनिजांवरील नवं विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झालंय.

खाणी आणि खनिजांवरील नवा कायदा संसदेत मंजूर, काय आहेत मोठे बदल?
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 11:08 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारचं खाणी आणि खनिजांवरील नवं विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर झालंय. यासह आता देशात नवा खाणी आणि खनिजे विकास आणि नियंत्रण (दुरुस्ती) कायदा 2021 लागू होण्याचा मार्ग मोकळा झालाय. यामुळे खाण क्षेत्रात मोठे बदल होणार असल्याचं बोललं जातंय. या कायद्यामुळे खाणींच्या उत्पादनाला वेग मिळेल आणि नोकऱ्याही तयार होतील, अशी माहिती केंद्रीय खाण आणि खनिज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. तसेच यामुळे आता मंजूरीसाठी प्रलंबित अनेक खाणी सुरु होण्यातील अडथळा दूर झाल्याचंही त्यांनी नमूद केलं (Mines and Minerals Development and Regulation Amendment Bill, 2021 passed in parliament).

प्रल्हाद जोशी म्हणाले, “हा नवा कायदा भारताच्या खाण क्षेत्राचा कायपालट करेल आणि भारताला खनिज उत्पादनात आत्मनिर्भर करेल. यामुळे खनिज संपन्न राज्यांमध्ये अनेक नोकऱ्यांच्या संधी खुल्या होतील. याशिवाय या कायद्यामुळे खाणींच्या कामात सुटसुटीतपणा येईल आणि खनिजांच्या उत्पादनात वाढ होऊन नवा विक्रम होईल. या कायद्यातील तरतुदींमुळे कायदेशीर अडथळे दूर होऊन लिलावासाठी मोठ्या प्रमाणात खाणी उपलब्ध होतील. त्यामुळे देशाच्या खनिज उत्पादनात वाढ होईल.”

खाण मालकांना खनिजं खुल्या बाजारातही विकता येणार

विशेष म्हणजे या कायद्याने खाण मालकांना खनिजं खुल्या बाजारात विकण्याचाही मार्ग मोकळा केलाय. त्या त्या खाणीशी संबंधित प्रकल्पाची गरज पूर्ण झाल्यानंतर खाणीतील 50 टक्क्यांपर्यतची खनिजं खुल्या बाजारात विकण्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे.

केंद्र सरकारचे खाणींच्या लिलावाचे अधिकार वाढले

या कायद्यामुळे केंद्र सरकारचे खाणींच्या लिलाव करण्याचे अधिकार वाढले आहेत. “राज्य सरकार ज्या ठिकाणी खाणींचे लिलाव करु शकणार नाही त्या ठिकाणी केंद्र सरकार खाणींच्या लिलावाची प्रक्रिया पार पाडेल. तसेच या खाणींचं उत्पन्न राज्य सरकारांनाच देण्यात येईल,” असं स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिलंय.

खाणींच्या शोधासाठी NMET कडून स्वायत्त संस्थेची स्थापना होणार

NMET कडून देशातील खाणींच्या शोधासाठी स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे. यात खासगी कंपन्यांचाही समावेश केला जाणार आहे. या अंतर्गत खाणींचा शोध ते खनिजांचं उत्पन्न यालाही वेग देण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. याशिवाय बेकायदेशीर खनिज तस्करीवरही या कायद्यात तरतुदी केल्याची माहिती मंत्री जोशी यांनी दिली आहे.

14 पक्षांपैकी 11 पक्षांची विधेयक निवड समितीकडे पाठवण्याची मागणी

माजी पर्यावरण मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले, “14 पक्षांपैकी दोन पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा दिलाय. एका पक्षाने 2 गंभीर आक्षेप नोंदवत या विधेयकाला पाठिंबा दिलाय, तर 11 पक्षांनी हे विधेयक संसदेच्या निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केलीय. हा कायदा मंजूर करुन संसदेच्या सर्वसामान्य मान्यतेला नाकारलं जात आहे. 14 पैकी 11 पक्षांची हे विधेयक संसदेच्या निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केलीय.”

‘केंद्र सरकारला अमर्याद शक्ती, जिल्हा खाण मंडळांच्या आणि राज्य सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण’

“या विधेयकातील कलम 10(1) आणि 14(3) राज्यांना संविधानाने दिलेल्या अधिकारांवर अतिक्रमण करत आहे. त्यामुळेच या सरकारला इतरवेळी पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी देखील या विधेयकाला विरोध केलाय. या विधेयकातील कलम 10(1) केंद्र सरकारला अमर्याद शक्ती देत आहे. यामुळे जिल्हा खाण आणि खनिज मंडळाच्या अधिकारांवर अतिक्रमण होतंय. सध्या या मंडळांकडे 37 हजार कोटी रुपयांचा निधी आहे. प्रत्येक वर्षी या निधीत 6-7 हजार कोटींनी वाढ होते. या विधेयकातील कलम 10 मधील तरतुदीतून केंद्र सरकार या अधिकारांवर आणि निधीवर आपला अधिकार सांगू पाहत आहे. हा प्रकार राज्य सरकारांना चपराक आहे,” असंही जयराम रमेश यांनी नमूद केले.

विधेयकातील कलम 14 ने खाणींच्या लिलावाचे राज्यांचे अधिकार केंद्र सरकारला

विधेयकातील कलम 14 ने खाणींच्या लिलावाचे राज्यांचे अधिकार केंद्र सरकारला दिल्याचाही आरोप जयराम रमेश यांनी केला. ते म्हणाले, “या तरतुदीमुळे राज्य सरकारला खाणींचा लिलाव करता येणार नाहीये. त्यामुळे जर हे विधेयक संसदेच्या निवड समितीकडे पाठवले गेले नाही आणि त्याला मंजूरी दिली तर राज्यसभा राज्यांच्या अधिकारांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरेल.”

हेही वाचा :

Farmer Protest : शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्यावर हल्ला, गाडीच्या काचा फोडल्या, गोळी चालवल्याचाही आरोप!

Assam Election 2021 : खासगी गाडीत EVM मशीन! 4 अधिकारी निलंबित, पुन्हा मतदान होणार

West Bengal Election 2021 : ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन, नंदीग्राममध्ये गोंधळाची स्थिती, ममता कोर्टात जाणार

व्हिडीओ पाहा :

Mines and Minerals Development and Regulation Amendment Bill, 2021 passed in parliament

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...