AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mini LockDown | Corona पेक्षा भयंकर व्हायरस, अनेकांचा मृत्यू, अखेर मिनी लॉकडाऊन

Mini Lockdown |ऐन सणासुदीच्या दिवसात जीवघेण्या व्हायरसचा धोका वाढत असल्याने प्रशासनाने मोठा निर्णय घेतलाय. प्रशासनाने या व्हायरसमुळे मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. जाणून घ्या सविस्तर.

Mini LockDown | Corona पेक्षा भयंकर व्हायरस, अनेकांचा मृत्यू, अखेर मिनी लॉकडाऊन
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Sep 16, 2023 | 7:13 PM

केरळ | कोरोनामुळे 2020 आणि 2021 ही 2 वर्ष भारतासाठीच नाही, संपूर्ण जगासाठीच आव्हानात्मक होती. कोरोनामुळे या 2 वर्षांच्या काळात अनेकांचा मृत्यू झाला. या कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळची माणसं गमावली. अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ आली. आर्थिक गणितं फिस्कटली. एकूणच कोरोनाने सर्वांचीच कंबर मोडून काढली. हा जीवघेणा कोरोना वर्षभरापासून नियंत्रणात आलाय. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी डॉक्टर आणि पॅरामेडीकल स्टाफने दिवस रात्र मेहनत घेतली. त्यानंतर कुठे सर्वकाही नेहमीप्रमाणे सुरळीत झालं.

कोरोनाचा ओसरता जोर पाहता राज्यासह देशात निर्बंध हटवण्यात आली. त्यानंतर पूर्णपणे सरसकट लॉकडाऊन हटवलं गेलं. त्यामुळे सर्व व्यवहार पुन्हा नियमित झालाय. आता राज्यासह देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. गणेशोत्सवाला मोजून काही तास शिल्लक आहेत. त्याआधी मोठ्या उत्साहात आगमन सोहळे सुरु आहेत.या आगमन सोहळ्यांसाठी मोठ्या प्रमाणात भक्तांचा एकच उपस्थिती पाहायला मिळतेय. मात्र या दरम्यान एक चिंताजनक बातमी समोर आली आहे.

कोरोनापेक्षा भयंकर आणि जीवघेण्या व्हायरसने आतापर्यंत अनेकांचा जीव घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाने सतर्क होत मिनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. तसेच खबरदारी म्हणून अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर सण आणि कार्यक्रमांवरही बंदी घालण्यात आली आहे. हा सर्व प्रकार नक्की कुठे घडलाय आपण जाणून घेऊयात.

निपाह व्हायरसचा ‘ताप’

कोरोनानंतर निपाह या व्हारसने सर्वांची चिंता वाढवलीय. निपाह व्हायरसमुळे धोका वाढला आहे. या निपाह व्हायरसचा केरळ राज्यात एक रुग्ण वाढला आहे. त्यामुळे केरळातील निपाह व्हायरस बाधित रुग्णांचा आकडा हा आता 6 वर पोहचला आहे. या निपाहने आतापर्यंत दोघांना दीव घेतलाय.

निपाह हळुहळु हातपाय पसरतोय. त्यामुळे आरोग्य यंत्रणा ही अलर्ट मोडवर आहे. केरळ सरकारने खबरदारी घेत कोझीकोडेत मिनी लॉकडाऊन जाही केलाय. ज्या भागात निपाहचे रुग्ण आढळलेत, तिथे ठराविक वेळेतच जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीसाठी वेळ ठरवून दिलाय. त्यामुळे आता केरळ आणि इतर राज्यांसाठीही येते काही दिवस हे महत्त्वाचे असणार आहेत.

प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....