रेल्वेतही मिळणार घरच्या जेवणाचा आनंद; भारतीय रेल्वेकडून नवरात्रीनिमित्त ‘खास थाळी’
भारतीय रेल्वेकडून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे तंत्र वापरले जात आहे. आता नवरात्री येत आहे, त्यानिमित्ताने व्रत करणाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला उपहासाचा आहार मिळणार आहे. तोही अगदी चविष्ट आणि घरात असतो तसा.
मुंबईः नवरात्रोत्सवामुळे भारतीय रेल्वेकडून (Indian Railway) प्रवाशांसाठी सलग नऊ दिवस स्पेशल मेनू (Special menu) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा 2 एप्रिलपासून रेल्वेतील प्रवाशांना देण्यात येणार आहे. नवरात्रीच्या काळात जे प्रवाशी रेल्वेतून प्रवास (Railway Passenger) करणार आहेत त्यांना अगदी त्यांच्या घरातील जेवणासारखे जेवण मिळणार आहे. यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने त्यांच्या मेनूमध्ये नवरात्रीचे खास खाद्यपदार्थ समाविष्ट केले आहेत, या पदार्थांच्या किंमतीही 99 रुपयांपासून सुरु होणार आहेत.
नवरात्रि के शुभ अवसर पर यात्रियों के लिए भारतीय रेल की तरफ से उपहार!
व्रत रखने वाले यात्री 1323 पर कॉल करके या https://t.co/az4WBJzfDM पर शुद्ध और सात्विक आहार बुकिंग कर सकते हैं।
“Food on Track” ऐप के जरिए भी इस सेवा का लाभ उठा सकते हैं। pic.twitter.com/2YSgvNNkZM
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 1, 2022
तुमच्यासाठी अशी असणार थाळी
1. आलू चाप हा पदार्थ उपवासाच्या वेळी असला तर त्याची चव नक्कीच लोकांना आवडते. त्यामुळे नाश्ता ताजे नारळ, शेंगदाणे, साबुदाणा असल्यामुळे हा पदार्थ चविष्ट बनतो.
2. साबुदाणा टिक्की या पदार्थाचाही समावेश या मेनूमध्ये असणार आहे. त्याचा सोनेरी चॉकलेटी रं होईपर्यंत हा पदार्थ तळला जातो. तेलात तळाल्यामुळे त्याला कुरकुरीतपणाही आलेला असतो. आणि तो जर दह्याबरोबर तुम्ही त्याची चव घेत असाल तर तो खातानाही मजा येते.
1. पनीर मखमली आणि साबुदाणा खिचडी नवरात्री थाळी ( यामध्ये कांदा, लसूण नसणार) यामध्ये साबुदाणा खिचडी, सिंघडा आलू पराठा, पनीर मखमली, अरबी मसाला, आलू चाप आणि सीताफळ खीर यांचाही समावेश आहे.
2. रेल्वेतून तुम्ही जर नऊ दिवस प्रवास करत असाल तर, तुम्हाला विविध पदार्थांची चव चाखता येणार आहे. यामध्ये कोफ्ता करी आणि साबुदाणा खिचडी नवरात्री थाळीमध्ये असणार आहे. साबुदाणा खिचडी, सिंघडा आलू पराठा, कोफ्ता करी, अरबी मसाला, आलू चाप आणि सीताफळ खीर यांचाही समावेश आहे.
3. पराठ्यांसोबत पनीर मखमली, अरबी मसाला या मेनूमध्ये पनीर मखमली, अरबी मसाला, आलू पराठ्याचा समावेश असणार आहे.
4. प्रवास करताना तुम्हाला जण खाण्यासाठी दही आवडत असेल तर या नवरात्री उत्सावात तुम्हाला नवरात्रीतील रेल्वेचा मेन्यू नक्कीच आवडणार आहे. यामध्ये साबुदाणा खिचडीसह दही असे उपवासाचा आहार असणार आहे. तसेच साबुदाण्यापासून बनवलेली हिरवी मिरची, मोहरी आणि भाजलेले शेंगदाणेही तुम्हाला मिळणार आहेत.
खास चवीची असणार खीर
ताज्या कस्टर्ड ऍपल पल्प आणि मलईसह सीताफळाची तुम्हाला खील मिळणार आहे. ही सीताफळ खीर तुमच्या उपवासाच्या आहाराचा आनंद द्विगुणित करणार आहे. या नवरात्रोत्सवात रेल्वेतून तुम्ही जर प्रवास करत असाल तर उपवासाची थाळी तुम्ही बूक करु शकणार आहात. त्यासाठी रेल्वेची IRCTC ची ई-कॅटरिंग सेवा वापरू शकता किंवा या1323 या क्रमांकावर तुम्ही तुमची थाळी बूक करु शकणार आहात.
संबंधित बातम्या
Metro 2A आणि Metro 7 रविवारपासून सेवेत! ईस्ट-वेस्टच्या ट्रॅफिकची चिंता मिटणार