ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने

कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळे या 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्राची नवी नियमावली; 12 देशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर घातली बंधने
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 7:19 AM

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून देशावर कोरोनाचे संकट आहे. मात्र वाढत्या लसीकरणामुळे रुग्णांची संख्या घटली होती. परंतु आता कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनमुळे (Omicron) खळबळ उडाली आहे. दक्षिण अफ्रिकेसह 12 देशांमध्ये कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आढळून आला आहे. दक्षिण आफ्रिके(South Africa)वरुन कर्नाटकात आलेले दोन प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आढळून आले होते. आता त्या पाठोपाठ डोंबिवलीतही दक्षिण आफ्रिकेवरुन आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. डोंबिवलीत केपटाऊन (Cape Town) शहरातून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ओमिक्रॉन विषाणू आढळलेल्या 12 देशातून भारतात परतणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली तयार करण्यात आली आहे.

‘असे ‘आहेत नवे नियम

अमेरिका, युरोपमधील काही देश,  दक्षिण आफ्रिका, ब्राझील, बांग्लादेश, चीन, बोत्सवाना, मॉरिशस, न्यूझिलंड, झिंबाब्वे, हाँगकाँग, सिंगापूर आणि  इस्राईलमध्ये हा कोरोनाचा नवा विषाणू आढळून आला आहे. त्यामुळे या देशातून भारतामध्ये येणाऱ्या प्रवाशांसाठी आरोग्य मंत्रालयाच्या वतीने नवी नियमावली तयार करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार संबंधित देशातून भारतामध्ये आलेल्या प्रवाशाला त्यांने मागील 14 दिवसांत कुठेकुठे प्रवास केला, त्याचा तपशील सादर करावा लागणार आहे. सोबतच त्याला कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल हवाई सुविधा पोर्टलवर सबमीट करणे बंधनकारक आहे. तरच संबंधित प्रवाशाला देशात प्रवेश मिळणार आहे. येत्या एक डिसेंबरपासून नवी नियमावली लागू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली.

मुख्यमंत्र्यांची टाक्स फोर्ससोबत बैठक

दरम्यान कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर रविवारी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत ओमिक्रॉन विषाणूबाबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला महत्वाचे आदेश दिले आहेत. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसंच लॉकडाऊन नको असेल तर आरोग्याची बंधनं पाळावीच लागतील. विमानतळांवर येणाऱ्या सर्व प्रवाशांकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देशही ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

संबंधित बातम्या 

संसदेचं आजपासून होणारं हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार, एमएसपी, महागाई विरोधकांच्या अजेंड्यावर

VIDEO : भाईंदरमध्ये ठाण्याची पुनरावृत्ती, फेरीवाल्यावर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने हल्ला

बँकांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ‘आरबीआय’चा महत्त्वपूर्ण निर्णय; …तर होणार कारवाई

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.