Rajasthan Crime: अल्पवयीन मुलीची प्रियकरासोबत आत्महत्या; राजस्थानातील घटना

सदर ठाणे हद्दीतील गावात शुक्रवार सायंकाळी अल्पवयीन मुलगी व तिचा 20 वर्षीय प्रियकर युवक घरातून बेपत्ता झाली होती. त्या दोघांचे कुटुंबिय परिसरात शोध घेत होते. याचदरम्यान सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील जंगलात अल्पवयीन मुलगी व तिच्या प्रियकराचा मृतदेह एका झाडाला लटकलेले आढळून आले.

Rajasthan Crime: अल्पवयीन मुलीची प्रियकरासोबत आत्महत्या; राजस्थानातील घटना
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 5:34 PM

जयपूर : राजस्थानच्या (Rajasthan) सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने 20 वर्षांच्या प्रियकरासोबत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जवळच्या जंगलात दोघांनी गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी दोन्ही प्रेमीयुगुलांचे मृतदेह ताब्यात घेतले असून आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. दोघांच्या आत्महत्येला कोण कोण जबाबदार आहेत, याचाही अधिक तपास सुरू आहे.

सदर ठाणे हद्दीतील गावात शुक्रवार सायंकाळी अल्पवयीन मुलगी व तिचा 20 वर्षीय प्रियकर युवक घरातून बेपत्ता झाली होती. त्या दोघांचे कुटुंबिय परिसरात शोध घेत होते. याचदरम्यान सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास गावाजवळील जंगलात अल्पवयीन मुलगी व तिच्या प्रियकराचा मृतदेह एका झाडाला लटकलेले आढळून आले. दोघांना मृतावस्थेत पाहिल्यानंतर गावभर खळबळ उडाली. घटनेची कुटुंबियांना खबर मिळाली, त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. नंतर मृतदेह पोस्टमार्टेमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

20 वर्षीय प्रियकर मजुरी करायचा!

आत्महत्या करणारा 20 वर्षांचा प्रियकर मजुरी करायचा. त्याचे घरासमोरील 16 वर्षांच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ती बारावी इयत्तेत शिकत होती. दोघे एकाच जातीचे आणि एकाच गोत्रचे होते. नात्याने दोघे एकमेकांचे भाऊ-बहिण होते. त्यामुळे त्यांच्या प्रेमसंबंधाला घरच्यांनी विरोध केला होता. त्यातून दोघे निराश झाले होते. याच नैराश्यातून दोघांनी जीवन संपवल्याचा संशय आहे.

सोबत जगणार नव्हते म्हणून सोबत मरण्याचा मार्ग पत्करला!

घरच्यांच्या विरोधामुळे हे प्रेमीयुगुल सोबत जगू शकणार नव्हते. त्यांचे लग्न होणार नव्हते. त्यामुळे दोघेही प्रचंड नाराज झाले होते. सोबत जगणार नाही, तर किमान सोबत मरण्याचा मार्ग पत्करू, याच भावनेने दोघांनी एकाचवेळी आत्महत्येचा निर्णय घेतला असावा, असा कयास स्थानिक पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी आता कुटुंबियांची कसून चौकशी केली जात आहे. (Minor girl commits suicide with boyfriend; Incidents in Rajasthan)

इतर बातम्या

Jammu-Kashmir: पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा पोलीस चौकीवर हल्ला; दोन पोलीस जखमी

धक्कादायक! आधी औषधाचा ओव्हरडोस, मग अपहरणाचा बनाव, 5 महिन्याच्या बाळाला आईनंच संपवलं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.