घराबाहेर खेळताना बिबट्याचा हल्ला, पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

बेपत्ता चिमुरडीचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरु होती. मात्र दुर्दैवाने शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह जवळच्या झुडपात सापडला. (girl death in leopard attack )

घराबाहेर खेळताना बिबट्याचा हल्ला, पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
आधा शकील
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 4:09 PM

श्रीनगर : मध्यवर्ती काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील ओमपोरा भागात गुरुवारी सायंकाळी 5 वर्षांच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. घराबाहेर खेळणारी आधा शकील (Adha Shakil) बेपत्ता झाल्यानंतर तिला बिबट्याने पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला जात होता. अखेर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळल्याने ही भीती खरी ठरली. आधाच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Missing five years old girl Adha Shakil mauled to death in leopard attack at Jammu Kashmir Budgam)

आधाचा शोध घेण्यासाठी जंगी मोहीम

शकील अहमद हे काश्मीरमधील ओमपोरा भागातील रहिवासी आहेत. त्यांची पाच वर्षांची मुलगी आधा शकील गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता होती. त्यासाठी सोशल मीडियावरुनही शोध मोहीम राबवली जात होती. आधाला बिबट्याने पळवल्याची खात्री झाल्यानंतर पोलिस, वन्यजीव पथकं आणि सैन्य दलाने तात्काळ पावलं उचलली. बेपत्ता चिमुरडीचा शोध घेण्यासाठी मोठी शोध मोहीम सुरु होती. मात्र दुर्दैवाने शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह जवळच्या झुडपात सापडला.

घनदाट झाडीमुळे परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन

सुरुवातीची शोधाशोध सुरु असताना स्थानिकांना रक्ताच्या खुणा सापडल्याने बिबट्याने आधाला नेले असावे, असा संशय व्यक्त झाला होता. नंतर जवळच्या झाडाझुडपात मुलीच्या शरीराचे भाग सापडल्यामुळे त्यांची भीती खरी ठरली. दाट झाडीजवळ कॉलनी वसलेली असल्याने या भागात बिबट्या दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. गेल्या काही दिवसांपासून बिबट्या या भागात फिरताना दिसतो, मात्र वन्यजीव अधिकाऱ्यांनी आपल्या मदतीसाठी काहीच केले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आम्ही वन्यजीव अधिकाऱ्यांकडे बरेच वेळा याकडे लक्ष देण्यासाठी विनंती केली आहे. ही झाडी आता घनदाट झाल्यामुळे अशा भयानक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलण्याची गरज आहे, असं स्थानिक म्हणतात. आधा बेपत्ता झाल्यानंतर ट्विटरवरुनही शोधाशोध सुरु झाली होती.

संबंधित बातम्या :

VIDEO: जम्मू काश्मीरमध्ये सर्वांसमोर बिबट्याचा एकावर हल्ला, कुणाचीही हिंमत झाली नाही, अखेर एकाच्या हिमतीने जीव वाचला

आईसोबत फिरायला गेलेल्या चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला, CISF जवानाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

(Missing five years old girl Adha Shakil mauled to death in leopard attack at Jammu Kashmir Budgam)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.