Gaganyaan Mission | वेलडन ISRO, मिशन गगनयानची मोठी चाचणी यशस्वी झाल्यानंतर इस्रो चीफ काय म्हणाले?

Gaganyaan Mission | मिशन गगनयानची द फ्लाइट टेस्ट व्हेइकल अबॉर्ट मिशन TV-D1 चाचणी यशस्वी ठरली आहे. ही चाचणी खूप महत्त्वाची होती. चांद्रयान-3 नंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी एक नवीन इतिहास रचला आहे. मानवी अवकाश मोहिमेआधी भारतीय शास्त्रज्ञांच हे मोठं यश आहे.

Gaganyaan Mission | वेलडन ISRO, मिशन गगनयानची मोठी चाचणी यशस्वी झाल्यानंतर इस्रो चीफ काय म्हणाले?
Gaganyaan Mission
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 11:01 AM

हैदराबाद : इस्रोच्या वैज्ञानिकांनी आणखी एक कमाल करुन दाखवलीय. चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोच्या वैज्ञानिकांनी मिशन गगनयानची पहिली चाचणी यशस्वी केली आहे. खराब हवामानामुळे द फ्लाइट टेस्ट व्हेइकल अबॉर्ट मिशन TV-D1 चाचणीची वेळ दोन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आधी 8 वाजता उड्डाण होणार होतं. पण पावसामुळे वेळ बदलून 8.30 करण्यात आली. नंतर पुन्हा वेळ 8.45 करण्यात आली. यावेळी काऊंड डाऊन सुरु असताना अखेरची 5 सेकंद उरली होती. त्यावेळी चाचणी उड्डाण स्थगित करण्यात आलं. लॉन्चिंगच नवीन शेड्युलड जाहीर करु असं इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं. त्यामुळे आज चाचणी होणार नाही, असं सर्वांना वाटलं. पण तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला. त्यामुळे चाचणीची नवीन वेळ जाहीर करण्यात आली.

क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टमसाठी आजची चाचणी महत्त्वाची होती. क्रू मॉड्यूलला अवकाशात पाठवल्यानंतर त्यांना पृथ्वीवर सुरक्षित परत कसं आणायच? त्या दृष्टीने ही चाचणी खूप महत्त्वाची होती. सगळे निर्धारित निकष आजच्या चाचणीत यशस्वीपणे पूर्ण झाले. TV-D1 व्हेईकल क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टमला घेऊन झेपावलं. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे उड्डाण झालं. निर्धारित उंचीवर गेल्यानंतर TV-D1 व्हेईकलपासून क्रू मॉड्यूल आणि क्रू एस्केप सिस्टम वेगेळ झाले. त्यानंतर क्रू मॉड्यूलच पॅराशूट ओपन झाले आणि यशस्वीरित्या बंगालच्या उपसागरात उतरले.

ही चाचणी खूप महत्त्वाची का होती?

ही खूप महत्त्वाची चाचणी होती. या चाचणीनंतर इस्रोच्या सेंटरमध्ये वैज्ञानिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. इस्रोचे प्रमुख एस.सोमनाथ यांनी Tv d1 मिशन यशस्वी झाल्याच जाहीर केलं. क्रू एस्केप सिस्टिमला यशस्वीपणे परत आणणं हा चाचणीचा उद्देश असल्याच त्यांनी सांगितलं. पॅराशूट ओपन झाल्यानंतर अपेक्षित वेगाने समुद्रात टच डाऊन झाल्याच ते म्हणाले. आता नौदलाची टीम आणि जहाज पॅराशूटची रिकव्हरी करेल. इस्रोचे वैज्ञानिक मिशनच्या पुढच्या टप्प्यासाठी त्याचा अभ्यास करतील. चाचणीने सर्व निर्धारित निकष पूर्ण केल्याच सोमनाथ यांनी सांगितलं. ही मानवरहीत चाचणी होती.

Non Stop LIVE Update
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'
शरद पवारांचे वारसदार कोण? दादा मिश्कीलपणे म्हणाले, 'मी रतन टाटांचा...'.
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'
'लाडकी बहिण'वर अजित पवार स्पष्टच म्हणाले, 'सरकारने ठरवलं तर...'.
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले...
अजित पवारांचे भाजपसोबत सूर जुळले की नाही? दादा स्पष्टच म्हणाले....
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर
ओ बारामतीच्या मोठ्ठ्या ताई.. फडणवीसांवरील टीकेवरून वाघांचं प्रत्युत्तर.
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका
'मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी...', खोत-फडणवीसांवर रोहित पवारांची टीका.
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य
'राज ठाकरे आणि आम्ही आता एकत्र नाही', भाजपच्या बड्या नेत्याचं वक्तव्य.
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा
भुजबळांनी ‘द इलेक्शन दॅट...’ पुस्तकातील दावे फेटाळले अन् दिला इशारा.
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य
सत्तेची समीकरणे बदलणार?, मलिकांनंतर अजित दादांच्या नेत्याच मोठ वक्तव्य.
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?
महायुती तर गती आणि उद्धव ठाकरेच खरा नेता, मुंबईत कुठे रंगलंय बॅनरवॉर?.
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला शेलारांची दांडी,अमित ठाकरेंसोबत भाजप?.