मिशन शक्ती यशस्वी, भारताने 300 किमी अंतराळात सॅटेलाईट पाडलं : मोदी

Mission Shakti(ASAT) नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ अवघ्या 3 मिनिटात पूर्ण केलं. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करुन आपण देशाला महत्त्वाची माहिती देणार […]

मिशन शक्ती यशस्वी, भारताने 300 किमी अंतराळात सॅटेलाईट पाडलं : मोदी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

Mission Shakti(ASAT) नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती जगाला दिली. भारताने 300 किमी अंतराळातील सॅटेलाईट भारतीय मिसाईलने पाडलं. अतिशय अवघड असं ‘मिशन शक्ती’ अवघ्या 3 मिनिटात पूर्ण केलं. अंतराळातील अशक्यप्राय सॅटेलाईट पाडणारा भारत केवळ चौथा देश ठरला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्विट करुन आपण देशाला महत्त्वाची माहिती देणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे मोदी नेमकी कोणती घोषणा करणार याबाबतची उत्सुकता होती. अखेर मोदींनी 12 वाजून 24 मिनिटांनी भारतीय वैज्ञानिकांच्या पराक्रमाची माहिती देशासह जगाला दिली. महत्त्वाचं म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या घोषणेपूर्वी भाजप नेत्यांचे, मंत्र्यांचे फोन बंद करण्यात आले होते.

अवकाशातील शत्रूचा सॅटॅलाईट अवघ्या काही क्षणात उध्वस्त करु शकू असं अँटी सॅटेलाईट मिसाईल भारतीय वैज्ञानिकांनी तयार केलं आहे. याची चाचणी आज पार पडली. अवघ्या तीन मिनिटात आपल्या या मिसाईलने तीनशे किलोमीटरवरील आपलं लक्ष्य साधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची माहिती थेट प्रक्षेपणाद्वारे देशवासीयांना दिली.

“LEO लाईव्ह सॅटेलाईटला भारताने मारलं आहे, भारताचं हे मोठं यश आहे, केवळ तीन मिनिटात हे यश मिळालं.  भारताने अवकाशात 300 किमी अंतरावरील सॅटेलाईट पाडलं, 3 मिनिटात ऑपरेशन यशस्वी झालं”, असं मोदी म्हणाले.

मिशन शक्ती हे अत्यंत अवघड होतं, वैज्ञानिकांनी लक्ष्य भेदलं, आम्हा सर्व भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे, मिशन शक्तीशी जोडलेल्या सर्व वैज्ञानिकांना सलाम, असं मोदींनी नमूद केलं.

आमच्या वैज्ञानिकांनी अंतराळात 300 किमी दूर LEO (Low Earth Orbit) मध्ये एका लाईव्ह सॅटेलाईट पाडलं. हे लाईव्ह सॅटेलाईट पूर्वनियोजित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल (A-SAT) द्वारे पाडण्यात आलं, असं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी काय म्हणाले?

“काही वेळापूर्वी भारताने मोठं यश मिळवलं आहे. भारताने अंतराळात हे यश मिळवलं. अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा चौथा देश ठरला.

भारताने अंतराळात एक सॅटेलाईट पाडलं आहे. भारताने या मोहिमेला मिशन शक्ती नाव दिलं होतं. या मोहिमेमुळे बारत आज अंतराळात महाशक्ती बनला आहे. LEO सॅटेलाईट पाडणं हे पूर्वनियोजित लक्ष्य होतं, ते केवळ 3 मिनिटात पूर्ण केलं.

भारतीय वैज्ञानिकांनी या मिशनअंतर्गत सर्व लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. या मोहिमेसाठी भारतीय बनावटीच्या सॅटेलाईटचा वापर करण्यात आला होता. आज आपल्याजवळ मुबलक प्रमाणात सॅटेलाईट आहेत, ज्यांचा वापर कृषी, संरक्षण, दूरसंचारसह अनेक क्षेत्रातील मदतीसाठी केला जातो.

भारताचा हा प्रयत्न कोणत्या देशाला नुकसान पोहोचवण्यासाठी नाही, तर संरक्षण क्षमता तपासण्यासाठी आहे. देशात शांतता राखणं हे आमचं ध्येय आहे, युद्धाची स्थिती निर्माण करण्याचा आमचा हेतू नाही, असं मोदींनी नमूद केलं.

आमच्या वैज्ञानिकांनी अंतराळात 300 किमी दूर LEO (Low Earth Orbit) मध्ये एका लाईव्ह सॅटेलाईट पाडलं. हे लाईव्ह सॅटेलाईट पूर्वनियोजित लक्ष्य होतं. त्याला अँटी सॅटेलाईट मिसाईल (A-SAT) द्वारे पाडण्यात आलं”, असं मोदी म्हणाले.

घोषणेपूर्वी मोदींचं ट्विट

मेरे प्यारे देशवासियों, आज  सवेरे लगभग 11.45 – 12.00 बजे मैं एक महत्वपूर्ण संदेश लेकर आप के बीच आऊँगा, असं ट्विट मोदींनी केलं आहे.

संबंधित बातम्या 

मिशन शक्ती यशस्वी, भारताने 300 किमी अंतराळात सॅटेलाईट पाडलं : मोदी  

आधी ट्वीट, मग भाषण… मोठ्या घोषणांसाठी मोदींची अनोखी स्टाईल  

‘मिशन शक्ती’बाबत नरेंद्र मोदींचं भाषण जसंच्या तसं, त्यांच्याच शब्दात  

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.