Assam Mizoram border dispute : मिझोराम पोलिसांचं टोकाचं पाऊल, थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा

आसाम आणि मिझोराम या दोन राज्यात सीमावादावरुन (Assam Mizoram border dispute) सध्या धुमश्चक्री सुरु आहे. मिझोराम पोलिसांनी  केलेल्या गोळीबारात आसामचे 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

Assam Mizoram border dispute : मिझोराम पोलिसांचं टोकाचं पाऊल, थेट आसामच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा
Himanta Biswa Sarma
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 9:26 AM

ऐझॉल (मिझोराम) : आसाम आणि मिझोराम या दोन राज्यात सीमावादावरुन (Assam Mizoram border dispute) सध्या धुमश्चक्री सुरु आहे. मिझोराम पोलिसांनी  केलेल्या गोळीबारात आसामचे 6 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर आसाममध्ये कार्यरत असलेले मराठमोळे IPS वैभव निंबाळकर (IPS Vaibhav Nimbalkar) यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी आहेत. या सर्व हिंसाचारानंतर आता मिझोरामने थेट आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Assam Chief Minister Himanta Biswa Sarma) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हत्येचा प्रयत्न, कट रचल्याचा आरोप असे अनेक गंभीर गुन्हे मुख्यमंत्री हिंमत सरमा यांच्यावर लावण्यात आले आहेत. इतंकच नाही तर त्यांना उद्या पोलीस स्टेशनला हजर राहण्यास बजावलं आहे.

मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यासह सहा वरिष्ठ अधिकारी आणि 200 पोलिसांवर गुन्हे दाखल केले आहेत. मिझोराम पोलीस महासंचालक जॉन एन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्वांविरुद्ध हत्येचा प्रयत्न आणि अन्य गुन्हेगारी कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीमांत नगरजवळ मिझोराम आणि आसाम पोलिसांमध्ये हिंसक झडप झाली होती. त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

आसाममधखील बराक घाटी परिसरातील कचार, करीमगंज आणि हाईलकांडीची 164 किमीची सीमा मिझोरम राज्यातील आईजोल, कोलासीब आणि मामित जिल्ह्यांना लागते. जमीनीच्या कारणावरुन ऑगस्ट 2020 पासून आतंरराज्य सीमेवर संघर्ष सुरु झाला आहे. मिझोरमचे पोलीस महानिदेशक लालबियाकथांगा खिंगागते यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीमध्ये वादग्रस्त भागात एटलांन नदीच्या जवळील भागात रात्री आठ झोपड्या जाळण्यात आल्याचं सांगितलं. हिमंता बिस्वा सरमा आसामचे मुख्यमंत्री झाल्यानंतर संघर्ष वाढला आहे. गेल्यावर्षी झालेल्या संघर्षानंतर केंद्र सरकारनं हस्तक्षेप केला होता.

आसाम आणि मिझोरमच्या मुख्यमंमत्र्यांचे आरोप प्रत्यारोप

आसाम आणि मिझोरममधील आंतरराज्यीय सीमा वादावरुन दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आरोप प्रत्यारोप केले आहेत. वादग्रस्त भागात आसाम आणि मिझोरममधील पोलीस दल आणि सामान्य नागरिकांमध्ये संघर्ष झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. तिथे गोळीबार झाल्याचं समोर आलं होतं. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप केले मात्र नंतर त्यांच्यात चर्चा झाल्याचं सागंण्यात आलं आहे. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची काही दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक देखील झाली होती.

मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामगांथा यांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांना त्याची आठवण करुन दिली. गृहमंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर आसाम पोलिसांच्या दोन तुकड्या आणि नागरिकांनी मिझोरममध्ये वॅरेनग्टे ऑटो रिक्षा स्टँडवर लाठीचार्ज करुन अश्रूधुराच्या कांड्या फोडल्याचं सांगितलं. सीआरपीएफच्या जवानांनी मिझोरम पोलिसांवर आक्रमण केल्याचा दावा मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी केला

संबंधित बातम्या  

पवारांच्या बारामतीत शिक्षण, बहीण अभिनेत्री, IPS वैभव निंबाळकरांच्या प्रकृतीसाठी देशभरात प्रार्थना!

Assam Mizoram Border Dispute: आसाम मिझोरम सीमा संघर्ष, मराठमोळे पोलीस अधिकारी वैभव निंबाळकर जखमी, पायात गोळी लागली, आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू

...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'
'महिलांना 2100 रू. कधी देणार? लाडक्या बहिणी वाट बघताय, आता...'.
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.