Tamilnadu Election 2021 : कमल हसन यांनी भाजप-काँग्रेसविरोधात दंड थोपटले, या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात
मक्कल नीधि मैय्यम (Makkal Needhi Maiam) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये दंड थोपटले आहेत.
चेन्नई : मक्कल नीधि मैय्यम (Makkal Needhi Maiam) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हसन यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये दंड थोपटले आहेत. त्यांनी विधासभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून लढणार याची घोषणा केलीय. ते तामिळनाडूतील दक्षिण कोईंबतुर मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत (MNM Chief and Actor Kamal Hasan announce his constituency in Tamil nadu Assembly Election 2021).
कमल हसन यांच्या विरोधात भाजपकडून महिला आघाडीच्या अध्यक्ष वनस्थी श्रीनिवासन यांना निवडणूक मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी कोईंबतूरमधून आपली उमेदवारी घोषित करताना कमल हसन म्हणाले, “कोईंबतूर हे ठिकाण माझ्या ह्रदयाच्या खूप जवळचं आहे. असं म्हटलं जातं की जर कोईंबतूर समृद्धी आणि भरभराट आली तर ती सगळीकडे पसरते. आता हे ठिकाण भ्रष्टाचाराची राजधानी झाल्याचं बोललं जातंय. मला हे चित्र बदलायचं आहे. तामिळनाडू विधानसभेत माझा आवाज पोहचण्याचा निर्णय जनतेच्या हातात आहे.”
“विशेष म्हणजे मी एक दिवस नेता व्हावं ही आपल्या वडिलांचीच इच्छा असल्याचंही कमल हसन यांनी यावेळी नमूद केलं. “मला माझी उमेदवारीची घोषणा करताना वडिलांची आठवण होतेय. राजकारणात जाण्याबाबत त्यांना महात्मा गांधींकडून प्रेरणा मिळाली होती. तेव्हा मला याचा अर्थ समजायचा नाही. संभाषण कौशल्यासाठी ते माझे गुरु होते. त्यांनी मला खूप लहानपणापासूनच याची शिकवण दिली,” असंही त्यांनी नमूद केलं.
‘मी आयएएस अधिकारी तर झालो नाही, पण आज माझ्या पक्षात अनेक प्रशासकीय अधिकारी’
कमल हसन म्हणाले, “माझे कुटुंबीय देखील मी एक दिवस नेता होईल, असं म्हणत. मात्र, माझा भाऊ चंद्रहसन हे माझ्या शिक्षणात आणि राजकारणाच्या मध्ये उभे होते. मी प्रशाकीय अधिकारी (IAS) अधिकारी व्हावं आणि मग राजकारणात जावं अशी त्यांची इच्छा होती. मी आयएएस अधिकारी तर झालो नाही, पण आज माझ्या पक्षात अनेक प्रशासकीय अधिकारी आहेत.”
हेही वाचा :
कमल हासनच्या पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अब्दुल कलामांच्या सल्लागाराला तिकीट
मोठी बातमी | अभिनेते कमल हासन स्वतः निवडणूक रिंगणात, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
व्हिडीओ पाहा :
MNM Chief and Actor Kamal Hasan announce his constituency in Tamil nadu Assembly Election 2021