modi 3.0 : मोदी सरकार पहिल्या 100 दिवसांत घेणार धाडसी निर्णय, संपूर्ण अ‍ॅक्शन प्लॅन तयार

narendra modi 100 days action plan: सरकारच्या यादीत NMDC स्टील लि., BEML आणि एचएलएल लाइफकेयर हे सर्वाजनिक उपक्रमसुद्धा आहेत. यापूर्वी 2022 मध्ये सरकारने एअर इंडिया (Air India) आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (एनआयएनएल) मधील आपली हिस्सेदारी विकली होती.

modi 3.0 : मोदी सरकार पहिल्या 100 दिवसांत घेणार धाडसी निर्णय, संपूर्ण अ‍ॅक्शन प्लॅन तयार
narendra modi
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 2:11 PM

भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारापूर्वी मोदी 3.0 सरकारचा शंभर दिवसांचा अ‍ॅक्सन प्लॅन तयार केला होता. त्याचा उल्लेख त्यांनी काही ठिकाणी केला होता. आता मोदी कॅबिनट या 100 दिवसांच्या अ‍ॅक्सन प्लॅनला अंतिम रुप देत आहे. मोदी 3.0 मध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही, यामुळे निर्णय घेण्यापूर्वी नरेंद्र मोदी सहकारी पक्षांशी चर्चा करणार आहे. परंतु या 100 दिवसांत मोठा निर्णय होणार आहे.

काय असणार निर्णय

मोदी सरकारच्या काळात निर्गुंतवणुकीत अजून आघाडी मिळाली नाही. आतापर्यंत सरकारला फारसे यश मिळालेले नाही. पण आता मोदी सरकार पहिल्या 100 दिवसांत आपल्या अजेंड्याअंतर्गत काही मोठी पावले उचणार आहे. या 100 दिवसांत काय होणार याविषयी आता अंदाज लावला जात आहे. वरिष्ठ सूत्रांकडून मिळाल्या बातम्यांनुसार, सरकार आयडीबीआय बँक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SCI) मधील आपला वाटा कमी करणार आहे.

या कंपन्यांवर लक्ष

सरकार पहिल्या 100 दिवसांत निर्गुंतवणुकीवर जोर देणार आहे. सरकारच्या यादीत प्रामुख्याने आयडीबीआय बँक, शिपिंग कॉरपोरेशन आहेत. मागील वर्ष निवडणुकीचे वर्ष होते. त्यामुळे सरकारने हा निर्णय थंड बस्तात टाकला होता. परंतु आता सरकार हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सध्या शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियामध्ये सरकारचा 63.75 टक्के वाटा आहे. तसेच आयडीबीआई बँकेची (IDBI Bank) निर्गुंतवणूक प्रक्रिया दीर्घ काळापासून थांबली आहे. या बँकेत सरकारचा 49.29 टक्के तर 45.48 टक्के वाटा एलआयसीचा आहे. सरकार आयडीबीआय बँकेतील आपला पूर्ण वाटा विकायचा आहे.

सरकारच्या यादीत NMDC स्टील लि., BEML आणि एचएलएल लाइफकेयर हे सर्वाजनिक उपक्रमसुद्धा आहेत. यापूर्वी 2022 मध्ये सरकारने एअर इंडिया (Air India) आणि नीलाचल इस्पात निगम लिमिटेड (एनआयएनएल) मधील आपली हिस्सेदारी विकली होती. शेअर बाजारात शिपिंग कॉरपोरेशन ऑफ इंडियाची कामगिरी चांगली होत आहे. मागील महिन्याभरात या शेअरच्या किमतीत 19 टक्ते तर वर्षभरात 134 टक्के वाढ झाली आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.