modi 3 cabinet: नारायण राणे, भागवत कराड यांचा पत्ता कट, महाराष्ट्रातून या नेत्यांना संधी
narayan rane and bhagwat karad modi cabinet 3.0: पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आतापर्यंत 41 जण पोहोचले आहेत. हे 41 जण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देताना जातीय गणितही लक्षात घेतले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आज पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तारही आज होत आहेत. त्यासाठी 41 नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. परंतु या नेत्यांमध्ये मोदी 2 मध्ये मंत्री असलेले नारायण राणे आणि भागवत कराड यांना स्थान देण्यात आले नाही. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. मोदी 2 मध्ये नारायण राणे एमएसएमई मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते. त्यांना यंदा मंत्रिमंडळात संधी नाही. परंतु महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव यांना पहिल्यांदाच संधी दिली आहे. नितीन गडकरी, पीयूष गोयल, रामदास आठवले यांचाही मंत्रिमंडळात समावेश आहे.
असा साधला समतोल
पंतप्रधान यांच्या निवासस्थानी आतापर्यंत 41 जण पोहोचले आहेत. हे 41 जण रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातील मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देताना जातीय गणितही लक्षात घेतले आहेत. तसेच राज्यांतील विविध भागांत समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. विदर्भातून 2 मंत्री आहेत. त्यात नितीन गडकरी (ब्राम्ह्यण) प्रतापराव जाधव (मराठा) चेहरे आहेत. उत्तर महाराष्ट्रातून यंदा पराभूत झालेल्या भारती पवार ऐवजी ओबीसी चेहरा रक्षा खडसे यांना संधी दिली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून मुरलीधर मोहोळ (मराठा चेहरा) तर मुंबईतून गुजराती चेहरा पियूष गोयल यांना संधी दिली आहे. शेड्युल कास्टमधून रामदास आठवले यांना संधी दिली गेली आहे.
मोदी 2.0 मधील हे वीस मंत्री आता कॅबिनेटमध्ये नसणार
- अजय भट्ट
- साध्वी निरंजन ज्योती
- मीनाक्षी लेखी
- राजकुमार रंजन सिंह
- जनरल वीके सिंह
- आरके सिंह
- अर्जुन मुंडा
- स्मृती ईरानी
- अनुराग ठाकूर
- राजीव चंद्रशेखर
- निशीथ प्रमाणिक
- अजय मिश्रा टेनी
- सुभाष सरकार
- जॉन बारला
- भारती पवार
- अश्विनी चौबे
- रावसाहेब दानवे
- कपिल पाटील
- नारायण राणे
- भगवत कराड
ही नेते पोहचले मोदी यांच्या निवासस्थानी
देशीतील विविध प्रांत, जाती, धर्म, समूह, तसेच आगामी राज्यातील निवडणुका ही समीकरणे लक्षात घेऊन नव्या मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आहेत.
- अमित शाह
- राजनाथ सिंह
- नितिन गडकरी
- एस जयशंकर
- पीयूष गोयल
- प्रल्हाद जोशी
- जयंत चौधरी
- जीतनराम मांझी
- रामनाथ ठाकुर
- चिराग पासवान
- एच डी कुमारस्वामी
- ज्योतिरादित्य सिंधिया
- अर्जुन राम मेघवाल
- प्रताप राव जाधव
- रक्षा खड़से
- जितेंद्र सिंह
- रामदास अठवले
- किरेन रिजुजु
- राव इंद्रजीत सिंह
- शांतनु ठाकुर
- मनसुख मांडविया
- अश्विनी वैष्णव
- बंडी संजय
- जी किशन रेड्डी
- हरदीप सिंह पुरी
- बी एल वर्मा
- शिवराज सिंह चौहान
- शोभा करंदलाजे
- रवनीत सिंह बिट्टू
- सर्वानंद सोनोवाल
- अन्नपूर्णा देवी
- जितिन प्रसाद
- मनोहर लाल खट्टर
- हर्ष मल्होत्रा
- नित्यानंद राय
- अनुप्रिया पटेल
- अजय टमटा
- धर्मेंद्र प्रधान
- निर्मला सीतारामन
- सावित्री ठाकुर
- राम मोहन नायडू किंजरापु
- चंद्रशेखर पेम्मासानी
- मुरलीधर मोहल
- कृष्णपाल गुर्जर
- गिरिराज सिंह
- गजेंद्र सिंह शेखावत
- श्रीपद नायक
- सी आर पाटील