Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MODI CABINET EXPANSION : मोठी बातमी! अश्विनी वैष्णव यांच्याकडे थेट केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा पदभार

दोन वर्षांपूर्वीच आश्विन वैष्णव यांनी ओडिशातून भाजपच्या तिकिटावर राज्यसभा निवडणूक जिंकले होती, विशेष म्हणजे संख्याबळ नसतानाही त्यांनी विजय मिळवल्यानं सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते.

MODI CABINET EXPANSION : मोठी बातमी! अश्विनी वैष्णव यांच्याकडे थेट केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा पदभार
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 10:20 PM

नवी दिल्लीः नोकरशाहीत आपला ठसा उमटवलेल्या आश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav)यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश झालेला असून, त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालयासारख्या मोठ्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलं आहे. पीयूष गोयल यांच्याकडे आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचाही कारभार दिलाय. आश्विनी वैष्णव यांसारख्या नव्या खासदाराकडे एवढा मोठा पदभार सोपवण्यात आल्यानं हा चर्चेचा विषय ठरत आहे. दोन वर्षांपूर्वीच आश्विन वैष्णव यांनी ओडिशातून भाजपच्या तिकिटावर राज्यसभा निवडणूक जिंकले होती, विशेष म्हणजे संख्याबळ नसतानाही त्यांनी विजय मिळवल्यानं सर्वच जण आश्चर्यचकित झाले होते. (MODI CABINET EXPANSION Ashwini Vaishnav is directly in charge of the Union Ministry of Railways)

वैष्णव हे 1994 च्या बॅचचे ओडिशा कॅडरमधील आयएएस अधिकारी

राजस्थानच्या जोधपूरमध्ये जन्मलेले 51 वर्षी वैष्णव हे 1994 च्या बॅचचे ओडिशा कॅडरमधील आयएएस अधिकारी आहेत. भाजपकडून उमेदवारी मिळवल्यानंतरही त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बीजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांचं समर्थन मिळवलं होतं. त्यावेळी बीजू जनता दलाच्या अनेक नेत्यांनी पटनायकांवर टीकाही केली होती. पटनायक पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दबावात वैष्णव यांचं समर्थन करत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

अमेरिकेतील व्हार्टन युनिव्हर्सिटीतून त्यांनी एमबीए केलं

वैष्णव हे 28 जून 2019 ला झालेल्या राज्यसभा निवडणुकीच्या सहा दिवस अगोदर भाजपमध्ये दाखल झाले होते. प्रशासकीय सेवेत असताना त्यांनी बालेश्वर आणि कटक जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या जबाबदारी निभावली होती. वर्ष 1999 मध्ये ओदिशात आलेल्या चक्रीवादळात त्यांनी आपल्या नोकरशाहीतील कौशल्याचा परिचय दिला होता. वैष्णव यांनी 2003 पर्यंत ओडिशामध्ये काम केलं आणि त्यानंतर ते तत्कालीन पंतप्रधान अटल बिहार वाजपेयींच्या कार्यकाळात उपसचिव नियुक्त झाले. वाजपेयी जेव्हा पंतप्रधानपदावरून पायउतार झाले तेव्हा त्यांना सचिव बनवण्यात आलंय. आयआयटीमधून शिक्षण घेतलेल्या वैष्णव यांनी 2008मध्ये सरकारी नोकरी सोडली होती. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील व्हार्टन युनिव्हर्सिटीतून एमबीए केलं. अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांनी काही मोठ्या कंपन्यांमध्ये नोकऱ्या केल्या आणि गुजरातमध्ये वाहनांचे सुटे भाग निर्माण करणारी कंपनी स्थापन केली.

संबंधित बातम्या

Modi Cabinet Expansion : मोदी मंत्रिमंडळातील नवं खातेवाटप जाहीर, नव्या सहकार खात्याची जबाबदारी अमित शाहांकडे, कोणत्या मंत्र्यांकडे कुठलं खातं?

MODI CABINET EXPANSION Ashwini Vaishnav is directly in charge of the Union Ministry of Railways
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.