Modi cabinet expansion: मोदींचा टॉप फोर जैसे थे, शाहांकडे सहकार, राणेंकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, एका क्लिकवर वाचा संपूर्ण खातेवाटप

पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलंय. पीयूष गोयल यांच्याकडे आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचा कारभार दिलाय. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमधील नव्या मंत्र्यांची सर्वत्र चर्चा आहे.

Modi cabinet expansion: मोदींचा टॉप फोर जैसे थे, शाहांकडे सहकार, राणेंकडे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालय, एका क्लिकवर वाचा संपूर्ण खातेवाटप
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 11:47 PM

नवी दिल्लीः मोदी मंत्रिमंडळाच्या कॅबिनेटचा विस्तार झाला असून, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय. राज्यातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार भागवत कराड आणि खासदार भारती पवार यांच्याकडे महत्त्वाची खाती सोपवण्यात आलीत. तर नोकरशाहीत आपला ठसा उमटवलेल्या आश्विनी वैष्णव यांचा मोदी मंत्रिमंडळात समावेश झालेला असून, त्यांच्याकडे रेल्वे मंत्रालयासारख्या मोठ्या मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आलंय. पीयूष गोयल यांच्याकडे आता केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचाही कारभार दिलाय. त्यामुळे मोदींच्या कॅबिनेटमधील नव्या मंत्र्यांची सर्वत्र चर्चा आहे. (Modi cabinet expansion: Narayan Rane has the ministry of micro, small and medium enterprises, read the whole minister list on one click)

?कॅबिनेट मंत्री

1. राजनाथ सिंग, केंद्रीय संरक्षणमंत्री

2. अमित शाह, केंद्रीय गृहमंत्रालय, सहकार मंत्रालय

3. नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते महामार्ग आणि वाहतूक मंत्रालय

4. निर्मला सीतारामण, केंद्रीय अर्थमंत्री आणि केंद्रीय कॉर्पोरेट कामकाज मंत्री

5. नरेंद्र सिंग तोमर, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री

6. सुब्रमण्यम जयशंकर, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री

7. अर्जुन मुंडा, केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री

8. स्मृती इराणी, केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री

9. पीयूष गोयल, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयासह वाणिज्य आणि उद्योग मंत्री

10. धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शिक्षणमंत्री, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजक मंत्री

11. प्रल्हाद जोशी, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री, केंद्रीय खाण आणि कोळसा मंत्री

12. नारायण राणे, केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्री

13. सर्बानंद सोनोवाल, आयुष मंत्री, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री

14. मुख्तार अब्बास नक्वी, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री

15. वीरेंद्र कुमार, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री

16. गिरीराज सिंग, केंद्रीय ग्रामविकास मंत्री, केंद्रीय पंचायत राज मंत्री

17. ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री

18. रामचंद्र प्रसाद सिंग, केंद्रीय पोलाद मंत्री

19. आश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वेमंत्री, केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री

20. पशुपती कुमार पारस, नवे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री

21. गजेंद्र सिंग शेखावत, नवे केंद्रीय जल शक्ती मंत्री

22. किरेन रिजिजू, केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री

23. राज कुमार सिंग, केंद्रीय ऊर्जामंत्री

24. हरदीप सिंग पुरी, केंद्रीय गॅस आणि पेट्रोलियम मंत्री, केंद्रीय गृहनिर्माण मंत्री

25. मनसुख मांडवीय, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री

26. भुपेंद्र यादव – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री आणि कामगार आणि रोजगार मंत्री

27. डॉ. महेंद्र नाथ पांडे – अवजड उद्योगमंत्री

28. पार्शोत्तम रुपाला – मत्स्यपालन, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री

29. जी. किशन रेड्डी – सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर प्रदेशाचे विकास मंत्री

30. अनुरागसिंग ठाकूर – माहिती व प्रसारण मंत्री आणि युवा कार्य व क्रिडा मंत्री

?राज्यमंत्री

1. राव इंद्रजितसिंग – सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); नियोजन मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय राज्यमंत्री

2. डॉ. जितेंद्र सिंग – विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पृथ्वी विज्ञान मंत्रालय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधानांच्या कार्यालयात राज्यमंत्री; कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालय राज्यमंत्री; अणु उर्जा विभागात राज्यमंत्री; आणि अवकाश विभागातील राज्यमंत्री

3. श्रीपाद येसो नाईक – बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय राज्यमंत्री; आणि पर्यटन मंत्रालय राज्यमंत्री

4. फग्गनसिंग कुलस्ते – स्टील मंत्रालय राज्यमंत्री; आणि ग्रामविकास मंत्रालय राज्यमंत्री

5. प्रल्हादसिंग पटेल – जलशक्ती मंत्रालय राज्यमंत्री; आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय राज्यमंत्री

6. अश्विनी कुमार चौबे – ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय राज्यमंत्री; आणि पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय राज्यमंत्री

7. अर्जुनराम मेघवाल – संसदीय कार्य मंत्रालय राज्यमंत्री; आणि सांस्कृतिक मंत्रालय राज्यमंत्री

8. जनरल (सेवानिवृत्त) व्ही. के. सिंह – रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय राज्यमंत्री; आणि नागरी उड्डयन मंत्रालय राज्यमंत्री

9. कृष्ण पाल – ऊर्जा मंत्रालय राज्यमंत्री; आणि अवजड उद्योग मंत्रालय राज्यमंत्री

10. रावसाहेब दादाराव दानवे – रेल्वे मंत्रालयात राज्यमंत्री; कोळसा मंत्रालय राज्यमंत्री; आणि खाण मंत्रालय राज्यमंत्री

11. रामदास आठवले – सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय राज्यमंत्री

12. साध्वी निरंजन ज्योती – ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय राज्यमंत्री; आणि ग्रामविकास मंत्रालय राज्यमंत्री

13. डॉ. संजीवकुमार बल्यान – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय राज्यमंत्री

14. नित्यानंद राय – गृह मंत्रालय राज्यमंत्री

15. पंकज चौधरी – वित्त मंत्रालय राज्यमंत्री

16. अनुप्रिया सिंह पटेल – वाणिज्य व उद्योग मंत्रालय राज्यमंत्री

17. प्रा. एस. पी. सिंह बघेल – कायदा व न्याय मंत्रालय राज्यमंत्री

18. राजीव चंद्रशेखर – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय राज्यमंत्री; आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय राज्यमंत्री

19. सुश्री शोभा करंदलाजे – कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय राज्यमंत्री

20. भानु प्रताप सिंह वर्मा – सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय राज्यमंत्री

21. दर्शना विक्रम जरदोष – वस्त्रोद्योग मंत्रालय राज्यमंत्री; आणि रेल्वे मंत्रालय राज्यमंत्री

22. व्ही. मुरलीधरन – परराष्ट्र मंत्रालय राज्यमंत्री; आणि संसदीय कार्य मंत्रालय राज्यमंत्री

23. मीनाक्षी लेखी – परराष्ट्र मंत्रालय राज्यमंत्री; आणि सांस्कृतिक मंत्रालय राज्यमंत्री

24. सोम प्रकाश – वाणिज्य व उद्योग मंत्रालय राज्यमंत्री

25. रेणुकासिंह सरुता – आदिवासी कार्य राज्यमंत्री

26. रामेश्वर तेली – पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री

27. कैलाश चौधरी – कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री

28. अन्नपूर्णा देवी – शिक्षण राज्यमंत्री

29. ए. नारायणस्वामी – सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री

30. कौशल किशोर – नागरी व्यवहार आणि गृहनिर्माण राज्यमंत्री

31. जय भट्ट – संरक्षण आणि पर्यटन राज्यमंत्री

32. बी. एल. वर्मा – पूर्वोत्तर प्रदेश विभाग विकास आणि सहकार राज्यमंत्री

33. अजय कुमार – गृहराज्यमंत्री

34. देवसिंह चौहान – संप्रेषण मंत्रालयात राज्यमंत्री (Minister of State in the Ministry of Communications)

35. भगवंत खुबा – रसायन व खते राज्यमंत्री, नवीन आणि नूतनीकरण करण्यायोग्य ऊर्जा राज्यमंत्री

36. कपिल मोरेश्वर पाटील – पंचायती राज राज्यमंत्री

37. प्रतिमा भौमिक – सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण राज्यमंत्री

38. डॉ. सुभाष सरकार – शिक्षण राज्यमंत्री

39. डॉ. भागवत कराड – वित्त राज्यमंत्री

40. डॉ. राजकुमार रंजन सिंह – परराष्ट्र राज्यमंत्री आणि शिक्षण राज्यमंत्री

41. डॉ. भारती प्रवीण पवार – आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री

42. बिश्वेश्वर टुडू – आदिवासी कार्य राज्यमंत्री आणि जलशक्ती राज्यमंत्री

43. शंतनू ठाकूर – बंदर, नौकानयन आणि जलमार्ग राज्यमंत्री

44. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई – महिला व बालविकास राज्यमंत्री आणि आयुष राज्यमंत्री

45. जॉन बार्ला – अल्पसंख्यांक राज्यमंत्री

46. डॉ. एल. मुरुगन – मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री

47. निसिथ प्रामाणिक – गृह राज्यमंत्री आणि क्रीडा राज्यमंत्री

संबंधित बातम्या :

Maharashtra New Ministers: राणे, पाटील, पवार, कराड यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ; महाराष्ट्राच्या वाट्याला चार मंत्रिपदे

‘कोण कुणाला अंगावर घेतं बघू’, नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यावर शिवसेनेचं आव्हान

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.