मोदी मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला मिळणार नवीन जबाबदारी? राज्यातून कोणाची नावे?
गुजरात निवणुकीत अभूतपुर्व यश मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपूत्र सी.आर.पाटील यांना दिल्लीत बोलवले जाणार आहे. त्यांच्यांकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. एकंदरीत कोणाला वगळणार? कोणाला पक्षात पाठवणार? याची माहिती फक्त एकाच व्यक्तीला आहे.
नवी दिल्ली : modi cabinet reshuffle: भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची (bjp meeting )बैठकीनंतर मोदींच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. २०२३ मध्ये नऊ राज्यात निवडणुका असलेल्या राज्यांसंदर्भातील रणनिती तयार केली जाणार आहे. दिल्लीत कडाक्याची थंडी असताना भाजपमधील वातावरण तापलंय. कोणाला पक्षसंघटनेच पाठवले जाणार? कोणाला मंत्रिमंडळात स्थान मिळेल? याची जोरदार चर्चा सुरु आहे. लोकसभेची २०२४ ची (Lok Shaba election) निवडणूक लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाचा (cabinet minister )विस्तार होणार आहे.
अनेक दिवसांपासून केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येत होत्या. त्यामुळे विद्यामान मंत्र्यामध्ये अस्वस्था निर्माण झालीय. या विस्तारात चांगली कामगिरी नसणाऱ्या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच भारतीय जनता पक्षात संघटनात्मक फेरबदल होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळातील काही जणांना संघटनेची जबाबदारी दिली जाणार आहे.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान आणि अनुराग ठाकूर यांना महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच गुजरात निवणुकीत अभूतपुर्व यश मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपूत्र सी.आर.पाटील यांना दिल्लीत बोलवले जाणार आहे. त्यांच्यांकडे महत्वाची जबाबदारी दिली जाणार आहे. एकंदरीत कोणाला वगळणार? कोणाला पक्षात पाठवणार? याची माहिती फक्त एकाच व्यक्तीला आहे. ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी असल्याचे भाजप नेते सांगताय.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारमध्ये अंतिम फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी मध्य प्रदेश, राजस्थान, कर्नाटकासह नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यादृष्टीने भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीत झालेल्या विचार मंथनानंतर मंत्रिमंडळात बदल होणार आहे.
महाराष्ट्रातून कोणाला संधी :
मंत्रिमंडळात बदल करताना महाराष्ट्र भाजपमधील एका बड्या नेत्याचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सुरु झालीय. हा नेत्या विद्यामान शिंदे सरकारमध्ये मंत्री आहे. त्या नेत्यास आता केंद्रात जबाबदारी दिली जाणार आहे. तसेच शिंदे गटाच्या काही चेहऱ्यांना केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाच्या कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार याकडेही राज्यातील जनतेसह राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.