Modi Cabinet Expansion: रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रेंचा राजीनामा?; दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग
मोदी मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.
नवी दिल्ली: मोदी मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. या दोन्ही खासदारांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेतल्याचं सांगितलं जात आहे. (Modi Cabinet reshuffle two minister resign before expansion including raosaheb danve and sanjay dhotre)
रावसाहेब दानवे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. ते जालन्यातील भोकरदन तालुक्यातील खासदार आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रीपदाची जबाबदारी आहे. मात्र, त्यांची कामगिरी चांगली नसल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
धोत्रेंच्या जागी कोण?
संजय धोत्रे हे अकोल्याती खासदार आहेत. त्यांच्याकडे सध्या मनुष्यबळ विकास मंत्रालयातील राज्यमंत्रीपद आहे. त्यांच्याही कामगिरीवर मोदी समाधानी नसल्याने त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याचं सांगितलं जात आहे. मोदींनी नुकतेच मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड मागवले होते. पण काही मंत्र्यांनी रिपोर्ट कार्ड दिलं नव्हतं. त्यामुळे मोदींनी हा मोठा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे धोत्रेंच्या जागी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
43 नेत्यांचा शपथविधी
आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहे, ही संख्या वाढून 81 होणार आहे.
शपथविधी पूर्वी चार मंत्र्यांचे राजीनामे
दरम्यान, आज संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीपूर्वीच चार मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी हे राजीनामे घेण्यात आले आहेत. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक, सदानंद गौडा, संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांचा समावेश आहे. नव्या चेहऱ्यांबद्दलही तेवढीच उत्सुकता आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरातसह जवळपास सहा राज्यातल्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल अशी चर्चा आहे. (Modi Cabinet reshuffle two minister resign before expansion including raosaheb danve and sanjay dhotre)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 7 July 2021 https://t.co/VxS5s4m6LJ #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 7, 2021
संबंधित बातम्या:
असे क्षण महत्त्वाचे असतात; नितेश राणे-निलेश राणे दिल्लीत दाखल
राणे, कपिल पाटलांचं मंत्रिपद फिक्स?, मोदींच्या निवासस्थानी दाखल; तर्कवितर्कांना उधाण
(Modi Cabinet reshuffle two minister resign before expansion including raosaheb danve and sanjay dhotre)