सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, आठवा वेतन आयोगसंदर्भात हालचाली
सातव्या वेतन आयोगानंतर आठवा वेतन आयोग स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government Employees) आनंदाची बातमी आहे. येत्या होळीपुर्वीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स यांना चांगली बातमी मिळू शकते. सातव्या वेतन आयोगानंतर (7th pay commission) आठवा वेतन आयोग (8th Pay Commission) स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आठवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार आहे. यामुळे पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात ४४ टक्के वाढ होऊ शकते, अशी शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचा डिएमध्ये वाढीचा निर्णय काही दिवसांत होणार आहे.
फिटमेंट फॅक्टरचा वापर
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारातील बदलासाठी फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) व्यतिरिक्त इतर सूत्राने पगाराचे पुनरावलोकन करण्याची शक्यता आहे. तसेच सातव्या आयोगाच्या तुलनेत आठव्या वेतन आयोगात बरेच बदल पाहायला मिळतील. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची 2023 सालची होळी आणि दिवाळी एकत्र साजरी केली जाणार आहे.
7 व्या वेतन आयोगांतर्गत, सध्या कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपये आहे. सरकारने या पगारासाठी फिटमेंट फॅक्टर लागू केला होता. त्यावेळी याला विरोध झाला होता, पण केंद्रीय कर्मचार्यांचे पगार निश्चित करण्यासाठी काही नवीन स्केल वापरायला हवेत, असे तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे म्हटले होते.
किती वाढणार पगार
सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर 2.57 पट होता, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 14.29 टक्क्यांनी वाढ झाली आणि या वाढीमुळे कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 18,000 रुपये निश्चित करण्यात आले. त्याच वेळी, आठव्या वेतन आयोगांतर्गत फिटमेंट फॅक्टर 3.68 पट असू शकतो, त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 44.44 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. त्याच वेळी, कर्मचार्यांचा किमान पगार थेट 18,000 रुपयांवरून 26,000 रुपयांपर्यंत वाढू शकतो.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन 26,000 पासून सुरू होऊ शकते. या क्रमाने पे मॅट्रिक्स लेव्हल-18 पर्यंतच्या पगारात वाढ होणार आहे. वेतन आयोगाचा कल पाहिला तर तो दर 8-10 वर्षांनी लागू होतो. आतापर्यंत 7व्या वेतन आयोगातील वाढ सर्वात कमी होती.
केव्हा लागू होईल आठवा वेतन आयोग?
सरकार लवकरच वेतन आयोग गठित केला जाऊ शकतो. तसेच त्याची अंमलबजावणी २०२६ पासून केली जाऊ शकते. २०२४ मध्ये होणार लोकसभा निवडणुकीत सरकारी कर्मचाऱ्यांना भेट देण्याची तयारी मोदी सरकारने चालवली आहे.
महागाई भत्ता कसा मोजला जातो?
महागाई भत्ता केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना दिला जातो. महागाईची तीव्रता कमी करणं हा यामागील उद्देश असतो. वाढत्या महागाईची झळ केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसू नये म्हणून त्यांच्या वेतनात सुधारणा केली जात असते. महागाई भत्ता वर्षातून दोन वेळा बदलला जातो. महागाई भत्ता हा कर्मचारी शहरी, निम शहरी आणि ग्रामीण भागात काम करतो यावर अवलंबून असतो.