मोदी सरकारची आठ वर्षे : मिशन इंद्रधनुषचं उद्दिष्टं किती सफल? केंद्र सरकारच्या कामाचा लेखाजोखा…

इंटेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहिमेदरम्यान 0 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांना नऊ आजारांपासून वाचवण्यासाठी BCG, पोलिओ, हिपॅटायटीस बी, पेंटाव्हॅलेंट, FIPV, RVV, PCV आणि MR लस दिली जाते.

मोदी सरकारची आठ वर्षे : मिशन इंद्रधनुषचं उद्दिष्टं किती सफल? केंद्र सरकारच्या कामाचा लेखाजोखा...
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 10:59 AM

मुंबई : मोदी सरकारने (Modi Government) केंद्रात आठ वर्षे पूर्ण केली आहेत. या निमित्त मिशन इंद्रधनुष या योजनेचा आढावा घेऊयात… मागच्या दोन वर्षात कोरोनामुळे अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागलं. यात आरोग्याविषयी लोक जागरूक झाले. लसीकरणाविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सरकारने एक योजना आखली. ज्या अंतर्गत महिला आणि बालकांच्या लसीकरणावर विशेष लक्ष दिलं गेलं. ही योजना म्हणजेच मिशन इंद्रधनुष. बालकांना आणि गरोदर महिलांना लसीकरण करण्यासाठी इंटेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष (Mission Indradhanush) अंतर्गत मार्चपासून दर महिन्याला विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. या महिन्यात 2 ते 12 मे दरम्यान मिशन इंद्रधनुष अंतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

मिशन इंद्रधनुष काय आहे?

इंटेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहिमेदरम्यान 0 ते 2 वर्षे वयोगटातील मुलांना नऊ आजारांपासून वाचवण्यासाठी BCG, पोलिओ, हिपॅटायटीस बी, पेंटाव्हॅलेंट, FIPV, RVV, PCV आणि MR लस दिली जाते. तसंच लसीकरणापासून वंचित राहिलेल्या गरोदर महिलांना टीडी-1, टीडी-2 आणि बूस्टर टीडी लस देण्यात येते.

योजनेच्या कामाचा आढावा

6414 बालकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सरकार काम करत होतं. 10816 बालकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. हे उद्दिष्टाच्या 168.63 टक्के आहे. तसंच लसीपासून वंचित राहिलेल्या 1348 गरोदर महिलांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट समोर होतं. या मोहिमेदरम्यान 1807 गरोदर महिलांना लसीकरण करण्यात आलं आहे. हे उद्दिष्टाच्या 134.05 टक्के आहे. पोलिओ, गोवर, हिपॅटायटीस, रोटाव्हायरस, धनुर्वात अश्या आजारांना टाळण्यासाठी बालकांचं लसीकरण केलं जातं. इंटेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष अंतर्गत लसीकरण बालक आणि गरोदर महिलांचं उद्दिष्टापेक्षा जास्त लसीकरण करण्यात आलं आहे.

मोहीम कशी चालते?

इंटेन्सिफाइड मिशन इंद्रधनुष लसीकरण मोहिमे अंतर्गत ज्या बालकांचं नियमित लसीकरणात लसीकरण करण्यात आलेले नाही, त्यांची माहिती घेऊन त्यांचं लसीकरण केलं जातं. यासोबतच गर्भवती महिलांना टिटॅनस डिप्थीरिया लसीकरण केलं जातं. याशिवाय कोरोनासाठीचं लसीकरण केलं जातं.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.