EPFO Interest : पीएफ धारकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, देशातील करोडो लोकांना फायदा

EPFO ने आर्थिक वर्ष 2022-23 साठी EPF व्याज दरात वाढ केली आहे. त्यामुळे देशातील करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे.

EPFO Interest : पीएफ धारकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, देशातील करोडो लोकांना फायदा
EPFO fixes 8.15% interest rate on employees' provident fund for 2022-23
Follow us
| Updated on: Mar 28, 2023 | 7:59 PM

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या ग्राहकांना मोठं गिफ्ट दिलं आहे. सरकारने ईपीएफवरील व्याजदर 8.10 वरून 8.15 टक्के केला आहे. म्हणजेच आता पीएफ खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर ग्राहकांना अधिक व्याज दिले जाणार आहे. त्यामुळे देशातील करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. याआधी मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4% DA वाढीची भेट दिली होती.

डीए नंतर पीएफ व्याजदर वाढ

देशात पुढच्या वर्षी म्हणजे लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी नरेंद्र मोदी सरकारकडून देशातील जनतेसाठी काही खास भेट मिळण्याची शक्यता आहे. सरकारने आधी डीएमध्ये वाढ केल्यानंतर आता पीएफवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. EPFO ने 2021-22 साठी EPF वरील व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत कमी केला होता, जो गेल्या 40 वर्षांतील सर्वात कमी व्याजदर होता. 1977-78 मध्ये 8 टक्के व्याजदर होता. तेव्हापासून तो नेहमीच 8.25 टक्क्यांच्या वर राहिला आहे.

व्याज वाढण्याचे हे पूर्ण गणित आहे

ईपीएफओने व्याजदरात केलेली ही वाढ फार मोठी नसली तरी देखील त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. 0.05 टक्के वाढ करण्यात आली असल्याने देशातील 6.5 कोटी पीएफ खातेधारकांनाही दिलासा देणार आहे. पीएफवरील व्याजाचे गणित पाहिल्यास कर्मचारी दरमहा त्याच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्यापैकी १२% योगदान देतो.

कंपनी देखील कर्मचार्‍यांच्या खात्यात 12% योगदान देतात. यातील 8.33% योगदान EPS आणि 3.67% EPF मध्ये जाते. ईपीएफ खात्यात जमा केलेल्या या रकमेवर कर्मचाऱ्यांना व्याज मिळते. तज्ञ अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, किमान पगाराच्या आधारावर, 15,000 रुपयांवर, पूर्वी 8.10% व्याजदरानुसार, वार्षिक 1,215 रुपये व्याज मिळत होते. दुसरीकडे, आता त्यात 0.05 टक्के वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे यानुसार व्याजाची रक्कम 8.15 टक्क्यांनुसार 1222.50 रुपये झाली आहे.

कोणत्याही कर्मचाऱ्याच्या खात्यातील एकूण जमा रकमेवर मिळणाऱ्या व्याजाबद्दल बोलायचे झाले तर असे गृहीत धरू की एखाद्या कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात 1 लाख रुपये जमा केले, तर त्याला वार्षिक 8.15% दराने 8,150 रुपये व्याज मिळते. पूर्वी ते 8,100 रुपये होते, म्हणजेच आता 50 रुपयांनी वाढ होणार आहे.

EPF व्याजदरांवर एक नजर

गेल्या काही वर्षांतील पीएफ ठेवींवर मिळालेल्या व्याजदरांवर नजर टाकली तर 2005 ते 2010 पर्यंत 8.50%, 2010-11 मध्ये 9.50%, 2012-13 मध्ये 8.50% आणि 2013-14 आणि 2014 मध्ये 8.75% व्याजदर होता. यानंतर 2015-16 मध्ये 8.80%, 2016-17 मध्ये 8.65%, 2017-18 मध्ये 8.55%, 2018-19 मध्ये 8.65%. नंतर 2019-20 आणि 2020-21 मध्ये ते 8.50% पर्यंत कमी केले गेले, तर 2021-22 मध्ये ते 8.10% च्या चार दशकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले होते.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...