भारताचा उल्लेख असलेला ‘तो’ मजकूर हटवा; मोदी सरकारचा सोशल मीडिया कंपन्यांना महत्त्वाचा आदेश
जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या निवेदनात B.1.617 व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. | Coronavirus Indian variant
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर कोरोना विषाणूच्या ‘इंडियन व्हेरिएंट’ची प्रचंड चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यांना महत्वपूर्ण आदेश दिले आहेत. त्यानुसार कोरोनाच्या (Coronavirus) B.1.617 या व्हेरिएंटचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट असा करू नये, अशा सक्त सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. तसेच अशाप्रकारचा उल्लेख असलेला मजकूर संबंधित व्यासपीठावरून तात्काळ हटवण्याचे निर्देश केंद्राने दिले आहेत. (Modi govt asked social meida companies to remove cotents referring to Indian variant of Coroanvirus)
यापूर्वी 11 मे रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या B.1.617 व्हेरिएंटविषयी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर काही वृत्तसंस्थांनी याचा उल्लेख इंडियन व्हेरिएंट, असा करायला सुरुवात केली होती. मात्र, हा दावा सपशेल पोकळ आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या निवेदनात B.1.617 व्हेरिएंटचा कुठेही भारताशी संबंध जोडलेला नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, चुकीच्या माहितीमुळे भारताच्या प्रतिमेला तडा जात आहे. त्यामुळे माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना इंडियन व्हेरियन्टबाबतचा मजकूर काढून टाकण्याचे निर्देश दिले.
He (Kamal Nath) is calling it Indian Corona. He further added ‘hamari pehchan, mera Bharat COVID.’ It’s an insult to India. Other Congress leaders also giving such statements. WHO clarified that no country’s name has been attributed to any variant:Union Minister Prakash Javadekar pic.twitter.com/uVorZx3e5p
— ANI (@ANI) May 22, 2021
B.1.617 व्हेरिएंट 44 देशांमध्ये
जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, B.1.617 व्हेरिएंटचा प्रसार जगातील 44 देशांमध्ये आढळून आला आहे. हा विषाणू अधिक वेगाने संसर्ग फैलावतो. त्यामुळेच भारतात कोरोनाची रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. मात्र, या कोरोना लसीमुळे या विषाणूचा प्रभाव कमी होतो, असेही WHO ने स्पष्ट केले होते.
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग दुसऱ्या दिवशी घट
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत आता काहीशी घट होताना दिसत आहे (Corona Cases in India). सलग तीन दिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ झाल्यानंतर कालच्या आकडेवारीत काहीशी घट पाहायला मिळाली. त्यानंतर आजही कोरोना रुग्णांच्या संख्या कालच्या तुलनेट घटली आहे. गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 57 हजार 299 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 194 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 630 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.
संबंधित बातम्या:
Coronavirus: कोव्हॅक्सिन घेणाऱ्या भारतीयांना आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करण्यास मज्जाव?
(Modi govt asked social meida companies to remove cotents referring to Indian variant of Coroanvirus)