Narayan Rane | ’13 वा बॉम्बस्फोट मशिदीत झाला असं पवारांनी…’, नारायण राणे नेमकं काय म्हणाले?VIDEO
Narayan Rane | "शरद पवारांनी आतापर्यंत देशात-राज्यात बरीच मंत्रीपद भूषवली. ते संरक्षण मंत्री, कृषीमंत्री होते. चारवेळा महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलं. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 साखळी बॉम्बस्फोट झाले"
नवी दिल्ली : “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इस्रायल-हमास लढ्याबाबत केलेली टीका दुर्देवी आहे. दहशतवाद कुणा एका व्यक्ती, देशाविरोधात नाहीय. माणुसकीविरोधात आहे. ही देशाची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी 20 आणि संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर मांडलीय. त्यांनी पॅलेस्टाइन विरोधात नाही, तर दहशतवादाविरोधात भूमिका घेतली” असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले. त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. “दहशतवादविरोधात भूमिका घेण चुकीच आहे, असं शरद पवार यांना म्हणायच आहे का? पॅलेस्टिनी आणि दहशतवादी एकच आहे, असं पवारांना म्हणायच आहे का?” असा सवाल राणेंनी विचारलाय.
“शरद पवारांनी आतापर्यंत देशात-राज्यात बरीच मंत्रीपद भूषवली. ते संरक्षण मंत्री, कृषीमंत्री होते. चारवेळा महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद भूषवलं. 12 मार्च 1993 रोजी मुंबईत 12 साखळी बॉम्बस्फोट झाले. 257 लोकाचा मृत्यू झाला. 1400 लोक जखमी झाले त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. 13 वा बॉम्बस्फोट मशिदीत झाल्याची खोटी माहिती देऊन त्यांनी दहशतवाद्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता का? तृष्टीकरणाच्या धोरणामुळे देशावर अनेक संकट आली, आता पवार तृष्टीकरण सोडून देशप्रथम भूमिका घेणार का?” असा सवाल नारायण राणे यांनी विचारला. “ठराविक धर्माच्या लोकांना वाचवण्यासाठी केली का?’
“मुख्यमंत्री असताना, 13 वा बॉम्बस्फोट मशिदीत झाला असं सांगून, शरद पवारांनी जनतेची दिशाभूल का केली? ठराविक धर्माच्या लोकांना वाचवण्यासाठी दिशाभूल केली का? मिशिदीत जे घडलं नव्हतं, त्याचा उल्लेख का केला? मौलान जिआऊद्दीन बुखारी यांची क्रॉफड मार्केटजवळ हत्या का झाली? ते कोण होते?” असे प्रश्न नारायण राणे यांनी विचारले आहेत.