मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय; निर्मला सीतारामन यांच्या पतीची चपराक

सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही. वास्तव परिस्थिती यापेक्षा भयानक आहे, असा आरोप परकला प्रभाकर यांनी केला. | Nirmala Sitharaman parkala prabhakar

मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय; निर्मला सीतारामन यांच्या पतीची चपराक
निर्मला सीतारामन आणि परकला प्रभाकर
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 8:26 AM

नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहा:कार उडाल्यानंतर आता केंद्र सरकारला (Modi govt) लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पती परकला प्रभाकर (Parkala Prabhakar) यांनी मोदी सरकारवर कडाडून टीका केली आहे. मोदी सरकार हे कोरोना रोखण्याऐवजी उपाययोजना करायचे सोडून हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली आहे. (Nirmala Sitharaman husband economist parkala prabhakar attacks on Modi govt)

एका ऑनलाईन चर्चेदरम्यान परकला प्रभाकर यांनी हे मत व्यक्त केले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना मृतांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. ही आपातकालीन परिस्थिती आहे. केंद्र सरकारने अशा परिस्थितीत लोकांची मदत करायला हवी. मात्र, केंद्र सरकार हेडलाईन मॅनेजमेंट आणि स्वत:ची पाठ थोपटून घेण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले.

या परिस्थिती केंद्र सरकार आणि त्यांच्या उपाययोजनांचे मूल्यमापन होण्याची गरज आहे. मात्र, त्यांना केवळ आपल्या लोकांच्या मृत्यूचे दु:ख आहे. इतरांचा मृत्यू त्यांच्यासाठी निव्वळ आकडा आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला धोरणात्मक सल्ला दिला होता. पण एका केंद्रीय मंत्र्याने तो असभ्य भाषेत धुडकावून लावला आणि त्यावरुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असे परकला प्रभाकर यांनी म्हटले.

‘केंद्र सरकार खरे आकडे जाहीर करत नाही’

अर्थतज्ज्ञ असलेल्या परकला प्रभाकर यांनी म्हटले की, कोरोना संकटामुळे लोकांच्या नोकऱ्या जात आहेत. रुग्णालयात उपचार करावे लागत असल्याने लोकांनी साठवलेले पैसेही संपत आहेत. या आर्थिक नुकसानानंतर अनेक लोक पुन्हा उभे राहू शकत नाहीत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 1.80 लाख लोकांचा जीव गेला आहे. मात्र, सरकार कोरोना रुग्णांचे खरे आकडे सांगत नाही. वास्तव परिस्थिती यापेक्षा भयानक आहे, असा आरोप परकला प्रभाकर यांनी केला.

‘राजकारण्यांना काहीच फरक पडत नाही’

देशातील लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. तसेच कोरोना चाचण्यांचे प्रमाणही घटत आहे. रुग्णालये आणि लॅब्स कोरोना चाचण्या करण्यास नकार देत आहेत. देशभरात रविवारी 3.56 लाख कोरोना चाचण्या झाल्या. मात्र, आदल्या दिवशीच्या तुलनेत हे प्रमाण 2.1 लाखांनी कमी आहे. बेडस्, ऑक्सिजन आणि आरोग्य सुविधांसाठी मारामारी सुरु आहे. मात्र, एकाही राजकारण्याला यामुळे फरक पडत नसल्याचे परकला प्रभाकर यांनी म्हटले.

निवडणुकीच्या प्रचारसभांवरुन मोदी सरकारला टोला

देशभरात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री प्रचारसभा घेत आहेत, गर्दी जमवत आहेत. कुंभमेळा सुरु आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर या सगळ्यांना जाग येते. मात्र, कहर म्हणजे आता तज्ज्ञ आणि काही लोक या सगळ्याचे समर्थन करत आहेत. दुसऱ्या देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती चांगली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हे सर्व फार धक्कादायक असल्याचे परकला प्रभाकर यांनी म्हटले.

संबंधित बातम्या :

Anupam Kher | ‘येणार तर मोदीच’ केंद्र सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

आता फक्त किरणची काळजी, अनुपम यांनी अमेरिकन वेबसीरीजला म्हटले ‘गुडबाय’!

‘शेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय हेतूने सुरू असल्याचे वाटते’,अनुपम खेर यांचे धक्कादायक विधान

(Nirmala Sitharaman husband economist parkala prabhakar attacks on Modi govt)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.