टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका

देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. (Modi Ji, Stop This Eventbaazi. Vaccinate All Who Need It: Rahul Gandhi)

टाळ्या-थाळ्या खूप झालं, आता व्हॅक्सिन द्या; राहुल गांधींची खोचक टीका
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 3:42 PM

नवी दिल्ली: देशात कोरोनाचा कहर प्रचंड वाढला आहे. दिवसाला दीड दीड लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ट्विट करून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. (Modi Ji, Stop This Eventbaazi. Vaccinate All Who Need It: Rahul Gandhi)

385 दिवसातही कोरोना विरुद्धचं युद्ध जिंकता आलेलं नाही. उत्सव, टाळ्या-थाळ्या आता खूप झाल्या. आता लोकांना व्हॅक्सीन द्या, असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे. सरकारच्या धोरणांमुळेच देशातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. दुसरीकडे लसींची कमतरता जाणवत आहे. शेतकरी-मजदूर संकटात आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. छोटे उद्योग धंदे बंद होत आहेत. मध्यमवर्गही त्रस्त झाला आहे, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

लसीकरणाचा वेग वाढवा

लसींची निर्मिती करणाऱ्या आवश्यक ती साधनसामुग्री पुरवली पाहिजे. त्यांना सुविधा द्या, म्हणजे लसीचं उत्पादन वाढेल. सध्याच्या गतीने लसीकरण सुरू राहिलं 75 टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्यासाठी अनेक वर्षे लागतील, असंही ते म्हणाले.

युद्ध की उत्सव?: चिदंबरम

यावेळी काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही मोदी सरकारवर टीका केली आहे. केंद्रातील सरकार कधी लसीकरण मोहिमेला उत्सव म्हणते तर कधी हे दुसरं युद्ध असल्याचं सांगितलं जातं. नेमकं हे काय आहे? असा सवाल चिदंबरम यांनी केला आहे. मोदींनी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली होती, तो दिवस आठवा. त्या दिवशी त्यांनी महाभारताचं युद्ध 18 दिवसात जिंकण्यात आलं होतं. कोरोना विरोधातील युद्ध 21 दिवसात जिंकू असं मोदीने म्हटलं होतं. त्या युद्धाचं काय झालं?, असा खोचक सवाल चिदंबरम यांनी केला आहे.

मोठमोठ्या गप्पांनी यश मिळणार नाही

पोकळ दावे, वायफळ बडबड आणि मोठमोठ्या गप्पा झोडल्याने कोरोना संसर्गाच्या विरोधात यश मिळणार नाही. आपलं अपयश लपवण्यासाठीच सरकार व्हॅक्सीनच्या पुरवठा आणि वितरणाच्या नियोजन व्यवस्थित करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. (Modi Ji, Stop This Eventbaazi. Vaccinate All Who Need It: Rahul Gandhi)

संबंधित बातम्या:

Corona Cases and Lockdown News LIVE : नागपुरात रुग्णालयाबाहेर ॲब्युलन्समध्ये रुग्णांची बेडसाठी प्रतिक्षा

ही घ्या संपूर्ण आकडेवारी, कोणत्या राज्याला किती लसी मिळाल्या आणि किती लसी फुकट गेल्या?

रुग्ण बेडवर झोपल्याचा राग अनावर, दुसऱ्या रुग्णाकडून हत्या; यूपीतील धक्कादायक प्रकार

(Modi Ji, Stop This Eventbaazi. Vaccinate All Who Need It: Rahul Gandhi)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.