मंकी फिव्हरने वाढवले टेन्शन, जाणून घ्या काय आहेत त्याची लक्षणे आणि उपाय
monkey Fever : मंकी फिव्हरने पुन्हा एकदा संकट वाढवले आहे. मंकी फिव्हरमुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे तर काही रुग्णांवर घरीच उपचार सुरु आहे. मंकी फिव्हर आहे तरी काय आणि त्याच्यावर उपाय काय आहे जाणून घ्या.
Monkey Fever : कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात ‘मंकी फिव्हर’चे 30 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. मंकी फिव्हर असलेल्या लोकांना वेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंकी फिव्हर असलेल्या लोकांची प्रकृती स्थिर आहे. सर्व रुग्णांची प्रकृती सामान्य आहे. त्यामुळे हा ताप कशामुळे येतो आणि त्याचे काय लक्षणं आहेत जाणून घेऊया.
‘मंकी फिव्हर’ म्हणजे काय?
हा एक Flaviviridae विषाणू आहे. हा विषाणू माकडांद्वारे पसरतो. एखादा मनुष्य जेव्हा संसर्ग झालेल्या या माकडाच्या संपर्कात येतो तेव्हा तो या आजाराचा बळी होऊ शकतो. हा ताप 1957 मध्ये पहिल्यांदा समोर आला होता. या रोगाचे नाव कर्नाटकातील कायसनूर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. लोक याला मंकी फिव्हर म्हणू लागले कारण त्यामुळे अनेक माकडांचा मृत्यू झाला होता.
काय आहेत याची लक्षणे?
– उच्च ताप
– थंडी वाजणे
– स्नायूंमध्ये वेदना जाणवणे
– डोकेदुखीची समस्या
– उलट्या होणे
– रक्तस्त्राव समस्या
– प्लेटलेट्स कमी होणे
– डोळा दुखणे आणि सूज येणे
आपण हे कसे रोखू शकतो?
मंकी फिव्हरवर एकमेव पर्याय म्हणजे लस. जी एका महिन्यात दोन डोसमध्ये दिली जाते. जंगलात किंवा आसपास राहणाऱ्या लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. कारण हा विषाणू बहुतेक फक्त जंगलात आढळतो. जनावरांशी संपर्क टाळून स्वच्छतेची काळजी घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येतो.
“शुक्रवारपर्यत मंकी फिव्हरचे 31 रुग्ण आढळले आहेत. 12 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, आतापर्यंत आम्हाला एकही गंभीर रुग्ण आढळलेला नाही. वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत स्तरावर उपाययोजना सुरु केल्या आहेत. सर्व तालुका आणि जिल्हा रुग्णालये अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी कर्मचारी आणि सुविधांनी सुसज्ज आहेत,” असे अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले.