Marathi News National Monkeypox has been declared a global health emergency, the World Health Organization has announced, with three cases in the country so far
Monkey pox:मंकीपॉक्स जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर, जागतिक आरोग्य संघटनेने केली घोषणा, देशात आत्तापर्यंत तीन प्रकरणे
या रोगाबाबत अत्यंत कमी माहिती असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यामुळेच ही महामारी आणीबाणी घोषित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली – भारतासह (India)जगभरात मंकीपॉक्सची (Monkey pox)प्रकरणे वाढताना दिसत आहेत. देशात आत्तापर्यंत मंकीपॉक्सची तीन प्रकरणे समोर आली आहेत. तर अमेरिकेत पहिल्यांदाच मंकीपॉक्सची लक्षणे लहान मुलांमध्ये दिसू लागली आहेत. मंकीपॉक्सचा वाढता प्रभाव पाहता जागतिक आरोग्य संघटनेने (World Health organization)मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, ७० हून अधिक देशांत मंकिपॉक्सचा वाढता प्रसार पाहता ही जागतिक आपातकालिन स्थिती आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी बैठकीत सदस्यांमध्ये एकमत झालेले नसतानाही ही घोषणा कली आहे. पहिल्यांदाच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखाने अशा प्रकारची घोषणा सर्वसहमीला गृहित न धरता केली आहे.
The World Health Organization has recently declared Monkeypox as another “public health emergency of international concern” or PHEIC on 23 July 2022. pic.twitter.com/xy1XYLdjkn
टेड्रोस यांनी सांगितले आहे की, आपण अशा एका महामारीचा सामना करीत आहोत, जी महामारी संक्रमणाच्या नव्या माध्यमांतून वेगाने जगभरात फैलाव करीत आहेत. या रोगाबाबत अत्यंत कमी माहिती असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यामुळेच ही महामारी आणीबाणी घोषित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचे संकट
कोरोना संक्रमणातून जग आत्ताच कुठे सावरत असताना मंकीपॉक्स या नव्या आजाराचा जगात प्रसार होताना दिसतो आहे. नंकीपॉक्सचे रुग्म गतीने जगभरातील सगळ्या देशात पाहायला मिळत आहेत. आपल्या देशातही मंकीपॉक्सचे आत्तापर्यंत तीन रुग्ण सापडले असून, हे तिन्ही रुग्ण केरळ राज्यात सापडले असल्याचे सांगण्यात येते आहे. एकाच राज्यात आठ दिवसांत तीन रुग्ण सापडल्याने राज्य आणि केंद्र सरकारने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. केरळ राज्यात या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी आता पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. केरळ सरकारच्या मदतीसाठी केंद्र सरकारने मल्टी डिसिप्लिनरी टीम पाठवण्याची घोषणा केली आहे. भारतात १४ जुलै रोजी मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण सापडला होता. हा रुग्ण दुबईतून भारतात आला होता. त्यानंतर या रुग्णाची चाचणी केल्यानंतर तो मंकीपॉ़क्स पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. आता सध्या या सगळ्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
काय आहेत मंकीपॉक्सची लक्षणे
मंकीपॉक्स आजारात तुमच्या संपूर्ण शरिरावर बारीक पुळ्या येतात. हा दुर्मीळ आजार मानण्यात येतो. सुरुवातीला संक्रमित व्यक्तीला ताप आणि फ्ल्यूसारखी लक्षणे जाणवतात. कांजण्यांसारखी याची लक्षणे आहे. सुरुवातीला ताप, पाठदुखी, सूज, डोकेदुखी सारखी लक्षणे जाणवतात. नंतर शरिरावर पुरळ उठू लागते. याचे विषाणू डोळे, नाक, श्वासांद्वारे इतरांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता असते. हा आजार बरा होणारा असला तरी सगळ्यांनीच याची काळजी घेण्याची गरज वर्तवण्यात येते आहे.