भारतात आढळला मंकीपॉक्सचा रुग्ण, भारतासाठी किती मोठा धोका? तज्ज्ञ काय म्हणतात
भारतात मंकीपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळून आल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे. हा साथीचा आजार नसल्याने घाबरून जाण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतात आढळलेल्या रुग्णाची स्थिती सध्या स्थिर आहे. त्याला क्लेड 2 विषाणूची लागण झाली असल्याचं आरोग्य विभागाने म्हटलं आहे. या विषाणू आणीबाणीचा भाग नाही.
भारतात पुन्हा एकदा मंकीपॉक्सचा धोका निर्माण झालाय. देशात मंकीपॉक्सचा आणखी एक संशयित रुग्ण आढळला आहे. संशयित रुग्णाबाबत आरोग्य तज्ञांनी सोमवारी सांगितले की घाबरण्याची गरज नाही, कारण मंकीपॉक्स व्हायरस (MPXV) महामारीचे रूप धारण करण्याची शक्यता फारच कमी आहे. मंकीपॉक्सने सध्या आफ्रिकेत कहर केला आहे. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पसरला आहे. भारतात देखील या विषाणूचा एक रुग्ण आढळल्याने लोकांची चिंता वाढली आहे. गेल्या वर्षीही भारतात मंकीपॉक्सचा धोका वाढला होता. जुलै 2022 मध्ये देशात मंकीपॉक्सची 30 प्रकरणे आढळली होती. जी क्लेड 2 विषाणूची होती. यावेळी संशयिताला त्रास होत आहे. क्लेड 2 हा आरोग्य विभागाकडून आणीबाणीचा भाग नाहीये. या प्रकारातील रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या विषाणूपासून सध्या तरी त्वरित धोका नाहीये. आफ्रिकेत क्लेड 1 हाहाकार माजवत आहे.
‘घाबरण्याची गरज नाही’
एम्स दिल्ली येथील प्रोफेसर डॉ. हर्षल आर. साळवे म्हणाले की, ‘घाबरण्याची गरज नाही. मृत्यू दर अजूनही उच्च आहे, परंतु संसर्ग फक्त जवळच्या संपर्कातच शक्य आहे. थेट संपर्काशिवाय प्रसारित होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे मंकीपॉक्स एक व्यापक महामारी बनण्याची शक्यता कमी आहे.”
मंकीपॉक्स म्हणजे काय?
Mpox हा एक विषाणूजन्य आजार आहे. याची लागण झाल्यानंतर ताप येतो, अंगावर पुरळ उठू लागतात. संसर्गानंतर, लिम्फ नोड्स सुजतात किंवा त्यांचा आकार वाढतो. लिम्फ नोड्स शरीराच्या रोगप्रतिकारक प्रणालीचा भाग आहेत. साळवे म्हणाले की, हा स्वत: बरा होणारा आजार आहे. त्यामुळे चार आठवड्यांत रुग्ण बरा होतो. आफ्रिकेतील सुमारे 13 देशांमध्ये मंकीपॉक्स पसरला आहे. ज्यामुळे जागतिक आरोग्य संघटना (WHO) ला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी लागली आहे.
एका तरुणामध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळून आले आहे. केंद्र सरकारने रविवारी सांगितले होते. रुग्णाला रुग्णालयात वेगळे ठेवण्यात आले आहे. देशातील mpox चे हे पहिलेच संशयित प्रकरण असल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने निवेदनात असे म्हटले आहे. तरुणामध्ये एमपीक्सची लक्षणे आढळून आली होती तो नुकताच संसर्गाने बाधित देशातून परतला होता. मंत्रालयाने सांगितले की, ‘रुग्णाला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असून सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र, हा तरुण कोणत्या देशात गेला होता, हे मंत्रालयाने उघड केलेले नाही. तो कोणत्या राज्याचा आहे याचा खुलासा करण्यात आलेला नाही.