उकाड्यापासून होईल लवकरच सुटका; मोसमी पाऊस चार दिवसांत तळकोकणात

देशभरातील लोक उकाड्याने हैराण झाले असून प्रत्येकाला सध्या मान्सूनची प्रतीक्षा आहे. अशातच आनंदाची बातमी समोर येत आहे. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून पुढील चार दिवसांत मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

उकाड्यापासून होईल लवकरच सुटका; मोसमी पाऊस चार दिवसांत तळकोकणात
Monsoon update
Follow us
| Updated on: Jun 04, 2024 | 12:03 PM

मोसमी पावसाने सोमवारी 3 जून रोजी कर्नाटक, आंध्र प्रदेशच्या काही भागांसह अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरात आगेकूच केली. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असून पुढील चार दिवसांत मोसमी पाऊस तळकोकणात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मोसमी पावसाने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात आगेकूच केली. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असून पुढील चार-पाच दिवसांत मोसमी पाऊस मध्य अरबी समुद्र, गोव्यासह तळकोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्याचसोबत तेलंगणा, ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या भागात आणखी आगेकूच करेल.

राज्यभरात पावसाची शक्यता

राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जना, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी पुणे, नगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. बुधवारी राज्यभरात पावसाचा अंदाज आहे. तर शुक्रवारी मुंबईसह संपूर्ण कोकणात पूर्व मोसमी पावसाच्या जोरदार सरी पडण्याचा अंदाज आहे.

उकाड्याने लोक हैराण

उत्तर भारतासह देशातील विविध राज्यांमध्ये भीषण उकाडा जाणवतोय. गेल्या काही दिवसांत राजस्थानच्या फलौदीमध्ये तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. तर राजधानी दिल्लीतसुद्धा 49 अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला होता. उत्तरप्रदेशच्या अधिकाधिक जिल्ह्यांमध्ये उकाड्यामुळे लोक हैराण झाले आहेत. उकाड्याने त्रस्त झालेल्या लोकांना आता फक्त पावसाची प्रतीक्षा आहे. केरळमध्ये यंदा मान्सून निश्चित वेळेच्या आधीच 30 मे रोजी दाखल झाला होता.

हे सुद्धा वाचा

स्कायमेट वेदर एजन्सीचे महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 27 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज आहे. त्याआधी पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. उत्तरप्रदेशात 18 ते 20 जूनच्या आसपास वाराणसी किंवा गोरखपूरमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो. याशिवाय लखनऊमध्ये 23 ते 25 जूनच्या आसपास पावसाचं दमदार आगमन होण्याचा अंदाज आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.