Mood of the Nation | नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपामध्ये पंतप्रधानपदाचा दुसरा उत्तम उमेदवार कोण? देशाचा मूड काय सांगतो?

Mood of the Nation | देशात नुकताच मूड ऑफ द नेशनचा ओपिनियन पोल जाहीर झाला. यामध्ये देशातील जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल? भविष्यात नेता म्हणून कोणाला पसंती असेल? या बद्दल लोकांनी आपली मत मांडली आहेत. यात एक इंटरेस्टिंग प्रश्न होता, नरेंद्र मोदीनंतर तुम्ही पंतप्रधानपदी कोणाला पाहता? त्यावर लोकांच काय उत्तर आहे? ते जाणून घ्या.

Mood of the Nation | नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपामध्ये पंतप्रधानपदाचा दुसरा उत्तम उमेदवार कोण? देशाचा मूड काय सांगतो?
Prime Minister Narendra ModiImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 1:23 PM

Mood of the Nation | केंद्रात 2014 साली 10 वर्षानंतर भाजपाच सरकार सत्तेवर आलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने हे यश मिळवलं. त्यानंतर भाजपाने मागे वळून पाहिलेलं नाही. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिष्मा असा आहे की, भाजपा एकापाठोपाठ एक निवडणुका जिंकत आहे. 2014 नंतर भाजपाने अनेक विधानसभा निवडणूक आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवलं. आता मूड ऑफ न नेशनच्या ओपनियन पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येतील असा अंदाज वर्तवला आहे. देशात आज सर्वत्र मोदींचा चेहरा आहे. पण नरेंद्र मोदींनंतर पुढे कोण ? असा प्रश्न आज अनेक लोकांच्या मनात आहे.

मूड ऑफ द नेशनच्या ओपनियन पोलमध्ये हाच प्रश्न सर्वसामान्यांना विचारण्यात आला. त्यावेळी 29 टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शाहना पसंती दिली. तेच मोदींचे उत्तराधिकारी आहेत, असं या लोकांना वाटतं. तेच 25 टक्के लोकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पसंती दर्शवली. आदित्यनाथ मोदी यांचा वारसा पुढे नेऊ शकतात असं या लोकांना वाटतं. म्हणजे अमित शाह आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये सध्या फक्त 4 टक्के मतांच अंतर आहे. दोघेही सध्या देशात महत्त्वाच्या पदावर विराजमान आहेत. सर्वसामान्य लोकांशी निगडीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकारी दोन्ही नेत्यांकडे आहेत.

नितीन गडकरींना किती टक्के लोकांची पसंती?

केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना 16 टक्के लोकांनी पसंती दर्शवली. नितीन गडकरी यांच्याकडे विकासाच व्हिजन असलेला नेता म्हणून पाहिलं जातं. पण सर्वेमध्ये असं दिसून आलय की, जनतेला जास्त कठोर छबी, निर्णय क्षमता असलेला नेता जास्त भावतो. मूड ऑफ द नेशनमध्ये सर्व लोकसभा मतदारसंघातील एकूण 35,801 लोकांशी बोलून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. 15 डिसेंबर 2023 ते 28 जानेवारी 2024 दरम्यान हा सर्वे करण्यात आला.

महत्त्वाच्या जागतिक नेत्यांमध्ये त्यांची गणना

पंतप्रधान नरेंद्र मोदी आजच्या घडीला देशातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा प्रत्येक शब्द झेलायला देशातील जनता तयार आहे. त्यांच्या बळावर भाजपाने देशात प्रचंड विस्तार केलाय. आज देशातच नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय पातळीवरही तितकेच लोकप्रिय आहेत. महत्त्वाच्या जागतिक नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.