मोरबी पूल पडला की पाडला?, 35 सेकंदाचा पहिला व्हिडीओ व्हायरल; काही तरुणांनी पूल…

गुजरातच्या मोरबीत पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. पूल कोसळल्यानंतर अजून 15 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मोरबी पूल पडला की पाडला?, 35 सेकंदाचा पहिला व्हिडीओ व्हायरल; काही तरुणांनी पूल...
मोरबी पूल पडला की पाडला?, 35 सेकंदाचा पहिला व्हिडीओ व्हायरल; काही तरुणांनी पूल...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 31, 2022 | 1:49 PM

अहमदाबाद: गुजरातच्या (Gujarat) मोरबीच्या मच्छु नदीवर एक हँगिग पूल (Morbi Bridge Collapse) तुटून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकूण 142 लोक दगावले आहेत. पुलावर शेकडो लोक होते. प्रमाणापेक्षा अधिक लोक पुलावर (Bridge Collapse) आल्याने हा 142 वर्ष जुना पूल कोसळला आणि मोठी दुर्घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. 30 सेकंदाच्या या व्हिडीओत पूल पडण्याच्या शेवटच्या क्षणाचे दृश्य आहेत. त्यातून पूल कोसळण्याची नेमकी कारणं समोर येण्यास मदत होणार आहे.

या 30 सेकंदाच्या व्हिडीओतून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा पूल ओव्हरलोडेड होता. पुलावर एकाच वेळी शेकडो लोक दाखल झाले होते. काली लोक पुलावर उभं राहून सेल्फी घेत होते. काही गोंगाट करत होते. काही धिंगा मस्ती करताना दिसत होते. तर चार ते पाच तरुण हा पूल हलवत होते. या व्हिडीओत हे स्पष्टपणे दिसत आहे. तरुणांनी पूल हलवल्याने हा पूल पडल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, तपासातूनच या पूल पडण्यामागचं सत्य बाहेर येणार आहे.

हे सुद्धा वाचा

मोरबीमध्ये काल रविवारी संध्याकाळी 6.30 वाजता ही दुर्घटना घडली. मच्छू नदीवर हा हँगिग ब्रिज आहे. पाच दिवसांपूर्वीच त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र, काल हा पूल थेट नदीत कोसळला. ही दुर्घटना घडली तेव्हा पुलावर 300-400 लोक उपस्थित होते. पूल तुटल्यानंतर काही लोकांनी पुलाचा भाग आणि दोरी घट्ट पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.

गुजरातच्या मोरबीत पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाला आहे. पूल कोसळल्यानंतर अजून 15 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अजूनही काही मृतदेह मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पुलाची देखरेख करणाऱ्या कंपनीवर निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.