अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती असंवेदनशील : सर्वेक्षण

जवळपास अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती संवेदनशील नाहीत, अशी माहिती आयएएनएस सी वोटरने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती असंवेदनशील : सर्वेक्षण
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 9:18 PM

नवी दिल्ली : जवळपास अर्ध्याहून अधिक भारतीय तिबेटप्रती संवेदनशील नाहीत, अशी माहिती आयएएनएस सी वोटरने केलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. या सर्वेक्षणात म्हटलं आहे की, चुकीच्या सूचना आणि माहितीच्या आभावामुळे तिबेटबाबत भारतात अशी स्थिती निर्माण झाली आहे. या सर्वेक्षणात म्हटले आहे की, 50 टक्क्यांहून अधिक भारतीय तिबेटच्या स्थितीबाबत अनभिज्ञ आहेत. तर जवळजवळ एक चतुर्थांश लोकांना वाटतं की तिबेट हे चीनचे एक राज्य आहे. तर तीन चतुर्थांश भारतीयांना तिबेटमधील परिस्थितीविषयी काहीच माहिती नाही. (More than half of Indians are insensitive about Tibet : IANS Survey)

भारतीय लोक तिबेटबाबत आणि तिथल्या परिस्थितीबाबत असंवेदनशील आहेत. केवळ ईशान्य भारतातील लोक तिबेटविषयी संवेदनशील आहेत. उतर भारतातील लोकांना तिबेटविषयी तुटपुंजी माहिती आहे. तर दक्षिण भारताला लोकांना तिबेटविषयी काहीच माहिती नाही. या भागातील लोक तिबेटविषयी खूपच असेंवदनशील आहेत. एक तृतीयांश भारतीयांना तिबेटमधील परिस्थितीबाबत कोणतीही चिंता नाही. तर उर्वरित भारतीयांना तिथली काहीच माहित नाही. त्यामुळे त्यांच्या तिबेटविषयी काहीच भावना नाहीत. भारतीयांना तिबेट भारताचा भाग वाटत नाही.

53 टक्के भारतीयांच्या मते भारतीय माध्यमं तिबेटविषयी कमी बातम्या देतात

जवळजवळ अर्ध्याहून अधिक भारतीयांचं मत आहे की, भारतीय माध्यमं तिबेटविषयी खूपच कमी बातम्या प्रसिद्ध करतात. अधिकांश भारतीय म्हणतात की, भारतात तिबेटचा मुद्दा अंडर-रिपोर्टेड आहे. त्या तुलनेत ईशान्य भारतातील लोकांचं मत वेगळं आहे. ईशान्य भारतातील 71 टक्के लोक म्हणतात की, गेल्या सहा महिन्यांपासून तिथल्या स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांवर, ऑनलाईन पोर्टल्सवर त्यांनी तिबेटबाबतच्या बातम्या पाहिल्या आहेत.

शहरी भागात राहणाऱ्या 50 टक्के भारतीयांचं म्हणणं आहे की, त्यांनी वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाईन पोर्टल्सवर गेल्या सहा महिन्यांमध्ये कधीही तिबेटविषयी बातम्या वाचल्या/पाहिल्या नाहीत. तर ग्रामीण भागातील 54 टक्के भारतीयांनी हेच विचार मांडले आहेत.

दलाई लामा यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात यावे

दोन तृतीयांश भारतीयांना वाटतं की बौद्ध धर्मगुरु दलाई लामा हे आधुनिक भारतातील एक प्रभावी सांस्कृतिक आणि आध्यात्मिक व्यक्ती आहेत. तर काहींना असे वाटते की, चीनबाबत दलाई लामा यांनी आक्रमक व्हायला हवे. त्यांनी तसे न केल्याने त्यांचं जागतिक स्तरावील राजकीय वजन कमी झालं आहे. दोन तृतीयांश भारतीयांना असे वाटते की, दलाई लामा यांना भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे.

हेही वाचा

तिबेटमध्ये चिनी सैनिकांकडून मिलिट्री लॉजिस्टिक हबची निर्मिती, सॅटेलाईट फोटोंतून उघड

भारतातील तिबेटियन नागरिकांच्या ‘या’ कृतीने चीनचा ब्‍लड प्रेशर वाढला, वाचा काय आहे प्रकरण?

(More than half of Indians are insensitive about Tibet : IANS Survey)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.