कोरोनानंतर देशात नव्या खतरनाक व्हायरसची एण्ट्री? पहिला रुग्ण आढळल्याचा दावा

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे (Most dangerous virus first Herpes Simplex Virus case found in India).

कोरोनानंतर देशात नव्या खतरनाक व्हायरसची एण्ट्री? पहिला रुग्ण आढळल्याचा दावा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 6:53 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाने (Corona Virus) प्रचंड थैमान घातलं. आधी कोरोनाची पहिली लाट आली. त्या लाटेवर भारताने मात केली. देशभरातील लॉकडाऊन (Lockdown) हटवण्यात आला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण पहिली लाट ओसरल्यानंतर अवघ्या काही महिन्यांनी भारतात पुन्हा कोरोनाची लाट आली. ही दुसरी लाट प्रचंड भयानक होती. या दुसऱ्या लाटेतील डेल्टा वेरिएंट हा विषाणू जास्त घातक ठरला. या विषाणूने हजारो रुग्णांचा जीव घेतला. आता ही लाट देखील ओसरताना दिसत आहे. पण ही लाट ओसरत असताना आणखी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणू नंतर देशात आणखी एका खतरनाक विषाणूची एण्ट्री झाल्याचा दावा तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे (Most dangerous virus first Herpes Simplex Virus case found in India).

गाझियाबादमध्ये पहिला बाधित रुग्ण आढळल्याचा दावा

कोरोना विषाणू पेक्षाही आणखी भयानक नवा विषाणू भारतात आढळल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला आहे. या विषाणूचा पहिला रुग्ण दिल्लीच्या गाझियाबाद येथील एका रुग्णालयात आढळल्याची माहिती समोर आली आहे. गाझियाबादमधील एका रुग्णालयात एका रुग्णाच्या नाकातून Herpes Simplex Virus असा नवा विषाणू आढळला आहे. हा विषाणू कोरोना विषाणू पेक्षाही जास्त घातक असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. तसेच भारतात गाझियाबादमध्ये या नव्या विषाणूचा पहिला बाधित रुग्ण आढळल्याचा दावा या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. विशेष म्हणजे या विषाणूवर नियंत्रण मिळवलं नाही तर देशात पुन्हा हाहा:कार माजेल, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे (Most dangerous virus first Herpes Simplex Virus case found in India).

कोरोनावर मात केलेल्यांना जास्त धोका

गाझियाबादचे डॉ. बीपी त्यागी यांनी या विषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यांच्या रुग्णालयात कोरोना आजारातून बरा झालेला रुग्ण दाखल झाला होता. त्याच रुग्णाच्या नाकात Herpes Simplex Virus हा नवा विषाणू आढळला आहे. हा विषाणू खूप घातक आहे. या विषाणूच्या बाधित रुग्णावर उपचारासाठी उशिर केला तर तो कोरोनापेक्षाही जास्त घातक ठरु शकतो. विशेष म्हणजे या विषाणूपासून बाधित रुग्णांचा उपचार खूप खर्चिक आहे, असाही दावा डॉ. त्यागी यांनी केला.

यावर इलाज काय?

कोरोनावर नुकतंच मात केलेल्या नागरिकांनी जास्त काळजी घेणं आवश्यक असल्याचं मत डॉ. त्यागी यांनी व्यक्त केलं. कोरोनाच्या संसर्गामुळे रोगप्रतिकार क्षमता कमकुवत होते. त्यामुळे कोरोनावर नुकतंच मात केलेल्या रुग्णांनी आपल्या जेवणाकडे आणि आरामाकडे लक्ष द्यावं. तसेच कोणत्याही प्रकाराची धावपळू करु नये, असंही डॉ. त्यागी यांनी सांगितलं.

संबंधित बातमी : औरंगाबादेत म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड, महागड्या इंजेक्शनसह सर्व औषधी मोफत

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.